लोहोणेर तीन दिवस बंदचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:19 PM2020-07-01T22:19:47+5:302020-07-01T23:03:51+5:30

लोहोणेर : नाशिक जिल्ह्यात तसेच देवळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोहोणेर ग्रामपंचायत ग्राम कोरोना समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने दि. २ ते दि. ४ जुलपर्यंत लोहोणेर गावातील संपूर्ण यवहार बंद करण्यात आले आहेत. तसेच दर गुरु वारी भरणारा आठवडे बाजार शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद राहील याची परिसरातील ग्रामस्थांनी, शेतकरी व भाजीपाला विक्र ेते यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Lohoner decided to close for three days | लोहोणेर तीन दिवस बंदचा निर्णय

लोहोणेर तीन दिवस बंदचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत सुरू राहतील.

लोकमत न्यूज नेटवर्क
लोहोणेर : नाशिक जिल्ह्यात तसेच देवळा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोहोणेर ग्रामपंचायत ग्राम कोरोना समिती आणि ग्रामस्थांच्या वतीने दि. २ ते दि. ४ जुलपर्यंत लोहोणेर गावातील संपूर्ण यवहार बंद करण्यात आले आहेत. तसेच दर गुरु वारी भरणारा आठवडे बाजार शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत पूर्णपणे बंद राहील याची परिसरातील ग्रामस्थांनी, शेतकरी व भाजीपाला विक्र ेते यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
रविवारपासून (दि. ५) किराणा, हार्डवेअर इतर दुकाने व भाजीपाला इत्यादी दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत सुरू राहतील. कृषी सेवा केंद्र सकाळी ७ ते सायंकाळी ७ यावेळेत सुरू राहतील.
भाजीपाला भर चौकात किंवा स्टँडवर विक्र ी करता येणार नाही. तसे आढळल्यास माल जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. बाहेरगावातील विक्र ेत्यांनी भाजीपाला व आंबा विक्र ीसाठी लोहोणेर गावात येऊ नये. हॉटेल व्यावसायिकांनी फक्त पार्सल सुविधा सुरू ठेवावी. वैद्यकीय आणि मेडिकल सेवा २४ तास सुरू राहतील. मास्क न वापरणाऱ्या नागरिकास १०० रुपये दंड आकारण्यात येईल.
वरील सर्व सूचनांचे नागरिकांनी पालन करून ग्रामपंचायत प्रशासनास व ग्रामकोरोना समितीस सहकार्य करण्याचे आवाहन सरपंच जयवंता बच्छाव, उपसरपंच रेश्मा महाजन, ग्रामपंचायत सदस्य यू. बी. खैरनार यांनी केले आहे.

Web Title: Lohoner decided to close for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.