सप्तशृंगगडावरील विश्वस्त पदावर स्थांनिकांना मिळणार न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 04:59 PM2020-10-04T16:59:58+5:302020-10-04T17:01:03+5:30

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी संस्थानच्या पाच सदस्य असलेल्या विश्वस्तांमध्ये स्थानिकाचा समावेश करण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश व ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

Locals will get justice for the post of trustee at Saptashringagada | सप्तशृंगगडावरील विश्वस्त पदावर स्थांनिकांना मिळणार न्याय

सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांची चर्चा करताना जिल्हा न्यायाधीश गणेश देशमुख.sapt

Next
ठळक मुद्देसप्तशृंगगडावरील कायम स्वरूपी स्थांनिकांना विश्वस्त पदावर नेमणूक करण्यासाठी घटनेत बदल करणार

सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दा व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी संस्थानच्या पाच सदस्य असलेल्या विश्वस्तांमध्ये स्थानिकाचा समावेश करण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधिश व ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख यांनी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी संस्थानच्या पाच सदस्य असलेल्या विश्वस्त निवडीमध्ये स्थानिकांना डावलल्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती, या बाबत ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला होता. तसेच निवड प्रक्रि येबाबत याचिकाही दाखल करणार होते पाच जागेसाठी २५८ अर्ज आले होते. परंतु या पाच जागेसाठी गडावरील एकाही ग्रामस्थांची वर्णी लागली नाही. या बाबत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रि या व्यक्त केल्या होत्या, तसेच विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने नवीन विश्वस्तांना गांव बंदीचा निर्णय घेण्यात आला होता.
नवीन विश्वस्त गडावर येणार म्हणून ग्रामस्थांनी कायदा व सुव्यवस्था सभांळूनच काळ्या फिती लाऊन ग्रामस्थ जाहीर निषेध करणार होते. परंतु जिल्हा सत्र न्यायाधिश गणेश देशमुख यांनी सर्व ग्रामस्थ या विषयावर चर्चा करून नक्की यातून काही तरी मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी दिले व ग्रामस्थांबरोबर एक तास चर्चा करून एका वर्षाला दोन ग्रामस्थ विश्वस्त पदावर घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले व सप्तशृंगगडावरील कायम स्वरूपी स्थांनिकांना विश्वस्त पदावर नेमणूक करण्यासाठी घटनेत बदल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Locals will get justice for the post of trustee at Saptashringagada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.