विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 01:23 PM2020-01-17T13:23:40+5:302020-01-17T13:25:41+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हरीण विहिरीत पडल्याची बातमी कळताच या कर्मचाऱ्यांनी तातडीने धावपळ करीत या विहिरीतून हरणाला बाहेर काढण्यात यश मिळवले.

 Lives of deer lying in the well | विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान

विहिरीत पडलेल्या हरणाला जीवदान

googlenewsNext

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हरीण विहिरीत पडल्याची बातमी कळताच या कर्मचाऱ्यांनी तातडीने धावपळ करीत या विहिरीतून हरणाला बाहेर काढण्यात यश मिळवले.
गुरुवारी (दि.१६) दुपारी ४ वाजता मुंडे वस्ती येथील शिवाजी वाल्मीक मुंडे यांच्या भरपूर पाणी असलेल्या विहिरीत हरीण पडले असल्याने या शेतकºयाने वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना फोन करून माहिती दिली व वन कर्मचारी व वनसेवक तत्काळ विहिरीवर हजर होऊन पाळण्याच्या साह्याने जिवंत हरणाला बाहेर काढण्यात यश आले.
सदर हरीण एक वर्ष वयाचे असल्याचे सांगण्यात आले. हरणाला बाहेर काढण्यासाठी वनरक्षक वाघ वन कर्मचारी पोपट वाघ, मच्छिंद्र ठाकरे, शेतकरी रवींद्र मुंडे, शिवाजी मुंडे, दत्तू मुंडे, दत्तू गोसावी, भागिनाथ मुंडे आदींनी मदत केली.
शेतात सध्या गहू हरभरा व कांदे पिके आहेत. या पिकाचे नुकसान हरण करीत आहे. हरणाच्या उपद्रवामुळे शेतकरी हैराण झाले हरणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. वनविभागाने बसून विहिरीना कठडे किंवा जाळी बसवावी, अशी मागणी जैविक विविधता समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घुगे यांनी केली आहे.

Web Title:  Lives of deer lying in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक