मालेगाव तालुक्यात वीज पडून दोन ठार; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:55 AM2019-10-05T01:55:04+5:302019-10-05T01:56:09+5:30

मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे वीज पडून दोन जण ठार, तर तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

Lightning kills two in Malegaon; Three injured | मालेगाव तालुक्यात वीज पडून दोन ठार; तीन जखमी

मालेगाव तालुक्यात वीज पडून दोन ठार; तीन जखमी

Next

झोडगे : मालेगाव तालुक्यातील टोकडे येथे वीज पडून दोन जण ठार, तर तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
टोकडे शिवारातील शेतात दीपक विठोबा डिंगर, समाधान गायकवाड, प्रतिभा सोनवणे, प्रवीण नवरे, खुशाल सोनवणे आदी शेतमजूर काम करीत होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. यावेळी वीज कोसळून दीपक विठोबा डिंगर (३०) व समाधान दयाराम गायकवाड (२४) हे जागीच ठार झाले. प्रतिभा रतिलाल सोनवणे (१९), प्रवीण देवाजी नवरे (१४) व खुशाल रतिलाल सोनवणे (१५) हे या घटनेत गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Web Title: Lightning kills two in Malegaon; Three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.