बारा वर्षीय मुलीचा खुन करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 06:13 PM2020-01-16T18:13:34+5:302020-01-16T18:14:27+5:30

लासलगाव : चांदवड तालुक्यातील नारायणगांव शिवारात घरात घुसुन कुºहाडीचे घाव घालत बारा वर्षीय मुलीचा खुन केल्याप्रकरणी संतोष गोविंद पवार यास निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पीठ. डी. दिग्रसकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Life sentence for murdering a twelve-year-old girl | बारा वर्षीय मुलीचा खुन करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

बारा वर्षीय मुलीचा खुन करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

Next
ठळक मुद्देसंतोष उर्फ वाल्मिक गोविंद पवार याच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.




लासलगाव : चांदवड तालुक्यातील नारायणगांव शिवारात घरात घुसुन कुºहाडीचे घाव घालत बारा वर्षीय मुलीचा खुन केल्याप्रकरणी संतोष गोविंद पवार यास निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पीठ. डी. दिग्रसकर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
नारायणगांव शिवारात बाबाजी शंकर गांगुर्डे यांचे घरात दि. १५ आक्टोबर २०१७ रोजी सायंकाळच्या सुमारास मनिषा बाबाजी गांगुर्डे (१२), वैशाली बाबाजी गांगुर्डे (१०), समाधान बाबाजी गांगुर्डे (९) हे घरात आईवडील नसतांना अभ्यास करत होते.
त्यावेळी संतोष ऊर्फ वाल्मिक गोविंद पवार (३७) हा हातात कुºहाड घेऊन आला व त्याने घरातील दरवाजे बंद करु न मुलांच्या डोक्यावर, कपाळावर कुºहाडीने घाव घातले.
या हल्यात मुलगी मनिषा उपचारादरम्यान मयत झाली होती, तर मुलगा समाधान व मुलगी वैशाली गंभीर जखमी झाले होते. याबाबत मुलांचे वडील बाबाजी गांगुर्डे यांनी वडनेरभैरव पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष उर्फ वाल्मिक गोविंद पवार याच्या विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरिक्षक ए. ओ. पाटील यांनी आरोपपत्र निफाडचे जिल्हा सत्र न्यायालयात पाठविले. सदर खटल्यात तपास अधिकारी, जखमी मुलीसह एकुण दहा साक्षीदारांची साक्ष सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड रमेश कापसे यांनी नोंदविली.
न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश पीठ. डी. दिग्रसकर यांनी संतोष उर्फ वाल्मिक गोविंद पवार यास भादवि कलम ३०२ अन्वये जन्मठेप व दहा हजार रु पये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास कलम ३०७ अन्वये दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रु पये दंड ,दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास, कलम ४५२ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रु पये दंड, दंड न भरल्या सहा महिने सश्रम कारावास, कलम ३४२ अन्वये एक वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

 

Web Title: Life sentence for murdering a twelve-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.