आराईत बिबट्या पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 08:52 PM2020-08-10T20:52:19+5:302020-08-11T01:15:50+5:30

सटाणा : तालुक्यातील आराई शिवारात नर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मादीचा शोध सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी दिली.

In a leopard cage | आराईत बिबट्या पिंजऱ्यात

आराईत बिबट्या पिंजऱ्यात

Next
ठळक मुद्देसटाणा : मादी, बछड्यांचा शोध सुरू

सटाणा : तालुक्यातील आराई शिवारात नर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. मादीचा शोध सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी दिली.
आराई परिसरात गेल्या दोन दिवसांपासून शेतशिवार व वस्तीवर राहणाºया नागरिकांना दोन बिबटे आढळून आले. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. दरम्यानच्या काळात एक शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला फस्त केले. काही नागरिकांच्या सांगण्यावरून नर मादी व त्यांचे दोन बछडे भक्ष शोधण्यासाठी शेतात वावरत असल्याचे आढळून आल्याचे सांगितले. बिबट्या आराई परिसरात वावरत असल्याची माहिती सरपंच मनीषा आहिरे व ग्रामविकास अधिकारी सुभाष भामरे यांनी वनविभागाला दिली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने ड्रोन कॅमºयाद्वारे बिबट्यांचा शोध घेण्याचे काम केले. त्यात नर-मादी दिसून आले. खर्डे शिवार ते रूमने शिवारपर्यंतचा त्यांचा वावर होता. मादी व बछड्याचा शोध घेतला जाईल मानवी किंवा वन्यजीव हानी होणार नाही यासाठी परिपूर्ण काळजी घेतली जाईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी सांगितले.बिबट्यांच्या पायाच्या ठश्यांवरून रूमने शिवारात वनविभागाने पिंजरा लावला असता रविवारी सायंकाळच्या सुमारास नर बिबट्या जाळ्यात अडकला. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलात सोडले जाईल.

Web Title: In a leopard cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.