देशातील पहिल्या किसान एक्स्प्रेसचा शुभारंभ ; शेतकऱ्यांसाठी रामबाण उपक्रम : नरेंद्रसिंह तोमर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 06:08 PM2020-08-07T18:08:30+5:302020-08-07T18:12:47+5:30

शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसला ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी तोमर बोलत होते.

Launch of the country's first Kisan Express; Panacea for farmers: Narendra Singh Tomar | देशातील पहिल्या किसान एक्स्प्रेसचा शुभारंभ ; शेतकऱ्यांसाठी रामबाण उपक्रम : नरेंद्रसिंह तोमर

देशातील पहिल्या किसान एक्स्प्रेसचा शुभारंभ ; शेतकऱ्यांसाठी रामबाण उपक्रम : नरेंद्रसिंह तोमर

googlenewsNext
ठळक मुद्देकिसान रेल्वेने जोडल्या देशांतर्गत बाजारपेठपहिल्याच दिवशी 50 टन माल रवानादेवळाली ते दानापूर दर शुक्रवारी सेवा

नाशिक :  किसान पार्सल एक्स्प्रेसमुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले. देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसला ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी तोमर बोलत होते. देवळाली कॅम्प ते दानापूर (बिहार) दरम्यान पहिली किसान एक्स्प्रेस धावणार आहे. 
रेल्वे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि इतर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी किसान एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार देवळाली कॅम्प ते दानापूर दरम्यान देशातील पहिली किसान पार्सल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली असून, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात आला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार सरोज आहेर आदी मान्यवर या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित होते. याप्रसंगी तोमर म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात देशाचा विकास थांबला असला तरी शेतीक्षेत्र मात्र त्यापासून प्रभावित झाले नाही. शेतकºयांनी त्याची झळ पोहोचू दिली नाही त्यामुळे देशात कोठेही अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार रेल्वे मंत्रालयाने आजपासून किसान पार्सल एक्स्प्रेस सुरू केली असून, ही गाडी शेतकऱ्यांसाठी खूपच लाभदायी ठरणार आहे. अत्यंत कमी दरात शेतकऱ्याना आपला माल परराज्यांत पाठविता येणार असल्याचे ते म्हणाले. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्हा कृषीसाठी महत्त्वाचा जिल्हा असून, देशातील पहिली रेल्वे नाशिकमधून सुरू होत आहे. नाशिकची निवड ही सार्थ निवड असून, किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजार पेठ मिळून या रेल्वेचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल.  पहिल्याच गाडीला फुलांच्या माळा लावून सजविण्यात आले होते. कृषिमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सकाळी ११ वाजून ०५ मिनिटांनी किसान एक्स्प्रेस दानापूरकडे रवाना झाली. पहिल्याच दिवशी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून तब्बल २२ टन, तर मनमाड रेल्वेस्थानकातून २६.५० टन माल दानापूरकडे रवाना करण्यात आला. देवळाली रेल्वेस्थानकावर आॅनलाइन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमास रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                                                                                 

Web Title: Launch of the country's first Kisan Express; Panacea for farmers: Narendra Singh Tomar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.