दिंडोरी तालुक्यात शिक्षकांची कोविड चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 08:21 PM2021-01-21T20:21:19+5:302021-01-22T00:28:48+5:30

वणी : इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग दिनांक २७ जानेवारी २०२१ पासून सुरू होत असून दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची कोविड १९ आरटीपीसीआर चाचणी ही वणी ग्रामीण रुग्णालय येथे गुरुवार (दि.२१) पासून सुरू झाली. दिंडोरी तालुक्यातील ९० प्राथमिक शिक्षकांचे आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली.

Kovid test of teachers in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात शिक्षकांची कोविड चाचणी

दिंडोरी तालुक्यात शिक्षकांची कोविड चाचणी

Next
ठळक मुद्दे दिंडोरी तालुक्यातील एक ते सात वर्ग असलेले ७५ प्राथमिक शाळा

वणी : इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग दिनांक २७ जानेवारी २०२१ पासून सुरू होत असून दिंडोरी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची कोविड १९ आरटीपीसीआर चाचणी ही वणी ग्रामीण रुग्णालय येथे गुरुवार (दि.२१) पासून सुरू झाली. दिंडोरी तालुक्यातील ९० प्राथमिक शिक्षकांचे आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली.
दररोज १०० शिक्षकांची चाचणी तीन दिवसात पूर्ण होईल, दिंडोरी तालुक्यातील एक ते सात वर्ग असलेले ७५ प्राथमिक शाळा आहेत. प्रत्येक शाळेतील चार शिक्षकांची चाचणी ज्यावेळेस घेण्यात येणार आहे. त्याचे नियोजन गटशिक्षण कार्यालयाततर्फे करण्यात आले आहे.

दरम्यान, पाचवी ते आठवी शाळा उघडणार म्हणून संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे. शाळा स्वच्छ करण्याचे व सेंटर सॅनिटायझर रेशन करून घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी हॅण्डवॉश स्टेशन उभारण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे दररोजचे तपमान मोजणी केली जाणार आहे. ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पद्धतीने अध्यापन होणार आहे. गणित सायन्स व इंग्रजी हे विषय ऑफलाइन शिकवले जातील. उरलेल्या विषय जे ऑनलाइन पद्धतीने शिकवणार आहेत, याचे नियोजन शाळा पातळीवरती मुख्याध्यापक व शिक्षक यांनी करावे असे गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी सांगितले.

Web Title: Kovid test of teachers in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.