शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची किसान काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 07:22 PM2020-10-07T19:22:30+5:302020-10-08T00:11:17+5:30

येवला : तालुक्यात वादळी व मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

Kisan Congress demands complete panchnama of agriculture | शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची किसान काँग्रेसची मागणी

शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची किसान काँग्रेसची मागणी

Next
ठळक मुद्देतालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली.

येवला : तालुक्यात वादळी व मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.
तहसीलदार कार्यालयात तहसिलदार प्रमोद हिले यांचा महात्मा गांधी यांची प्रतीमा, गांधी टोपी-उपरणे देवून किसान काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद लोहकरे यांनी सत्कार केला. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. अस्मानी आणि सुल्तानी संकटात सापडलेल्या तालुक्यातील शेतकºयांना न्याय द्यावा, नुकसानग्रस्त शेतकºयांच्या शेतपिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
या प्रसंगी राजू भंडारी, एकनाथ गायकवाड, अरु ण अहिरे, भास्कर आव्हाड, संतोष दौंडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Kisan Congress demands complete panchnama of agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.