नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 04:42 PM2020-08-08T16:42:27+5:302020-08-08T16:43:39+5:30

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पाऊस सुरू असल्याने नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. फरशीपुलावरही खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डे समजून येत नसल्याने वाहने खड्ड्यात आपटून नुकसान होत आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.

Kingdom of potholes on Nandurshingote to Wavi road | नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

Next
ठळक मुद्दे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागात पाऊस सुरू असल्याने नांदूरशिंगोटे ते वावी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. फरशीपुलावरही खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचत असल्याने खड्डे समजून येत नसल्याने वाहने खड्ड्यात आपटून नुकसान होत आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे.
नांदूरशिंगोटे ते वावी हा संगमनेर, कोपरगावसाठी जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. परिसरातील शेतकरीआपला शेतमाल याच मार्गाने व्रिकीसाठी नेत असतात. पावसामुळे रस्त्याची वाट लागली आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी नांदूरशिंगोटे, मानोरी, कनकोरी, निºहाळे, मºहळ, माळवाडी,वावी, सुरेगाव, फत्तेपूर भागातील प्रवासीवर्गाने केली आहे. 

Web Title: Kingdom of potholes on Nandurshingote to Wavi road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.