संवेदना जागृत ठेवून कर्तव्य करा : फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:55 AM2018-10-06T00:55:10+5:302018-10-06T01:18:12+5:30

सामान्य माणसाचे रक्षण हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य करा, गुन्हेगारांवर जरब बसविताना आपल्यातील माणूसपण जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे़ कर्तव्य करताना संवेदना जागृत ठेवण्यास जबाबदारी आणखी चांगल्या पद्धतीने पार पाडता येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़

Keep the duty of keeping the news network aware alive: Fadnavis | संवेदना जागृत ठेवून कर्तव्य करा : फडणवीस

संवेदना जागृत ठेवून कर्तव्य करा : फडणवीस

Next
ठळक मुद्देदीक्षान्त समारंभ : पोलीस उपनिरीक्षक ११५ वी तुकडी

नाशिक : सामान्य माणसाचे रक्षण हा एकमात्र उद्देश डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य करा, गुन्हेगारांवर जरब बसविताना आपल्यातील माणूसपण जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे़ कर्तव्य करताना संवेदना जागृत ठेवण्यास जबाबदारी आणखी चांगल्या पद्धतीने पार पाडता येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या शुक्रवारी (दि़ ५) झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११५व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी राजेश जवरे यांच्यासह पुरस्कारप्राप्त प्रशिक्षणार्थीचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला़ फडणवीस पुढे म्हणाले की, लोकशाही मूल्यांचे संवर्धन आणि पालन महत्त्वाचे आहे. ही मूल्ये प्रशिक्षणापुरती मर्यादित न ठेवता कार्यक्षेत्रात उपयोगात आणावी. तत्परता आणि संयम यांच्या समन्वयातून जीवनात परिवर्तन घडवून आणता येईल.
प्रबोधिनीच्या संचालक अश्वती दोर्जे यांनी प्रास्ताविक केले. या दीक्षान्त समारंभाच्या संचलनाचे नेतृत्व कुणाल चव्हाण व राजेश जवरे यांनी केले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, डॉ. रणजित पाटील (गृह राज्यमंत्री- शहरे) , दीपक केसरकर (गृह राज्यमंत्री- ग्रामीण), मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, सहसंचालक संजय मोहिते, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे आदींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नाशिकच्या कुणाल चव्हाण यांना तीन पुरस्कार
नाशिक जिल्ह्यातील कुणाल चव्हाण यांनी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचे तीन पुरस्कार मिळविले़ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सर्वोत्कृष्ट फिजिकल ट्रेनिंग, ड्रिल व उत्कृष्ट गणवेश पुरस्कार प्रदान करण्यात आला़
एमपीएतील सप्तशृंगी संकुलाचे उद्घाटन
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी परिसरातील खुले सभागृह व सप्तशृंगी संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले़ महाराष्टÑ राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने तयार केलेले खुले सभागृह ३ कोटी ६० लाख रुपये खर्चून तयार करण्यात आले आहे़ तर सप्तशृंगी संकुलात १६८ पोलीस निवासस्थानांचे बांधकाम करण्यात आले असून, ४१ कोटी ८७ लाख रुपयांचा हा प्रकल्प आहे़ खुले सभागृह प्रशिक्षणार्थींना सांस्कृतिक कार्यक्रमासाठी तर सप्तशृंगी संकुलात १६८ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहे़

Web Title: Keep the duty of keeping the news network aware alive: Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.