व्हॉलीबॉल स्पर्धेत करंजाळी महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:44 PM2019-10-18T18:44:00+5:302019-10-18T18:44:32+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सिन्नर येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत करंजाळी येथील एमजेएम महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्र मांक पटकावला.

Karunjali College's success in volleyball competition | व्हॉलीबॉल स्पर्धेत करंजाळी महाविद्यालयाचे यश

करंजाळी येथील एमजेएम महाविद्यालय विजेत्या व्हॉली बॉल संघासोबत प्रा. डॉ. दीपक जुंद्रे व मान्यवर.

Next

पेठ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित सिन्नर येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धेत करंजाळी येथील एमजेएम महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्र मांक पटकावला.
या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातून ४५ संघांनी सहभाग नोंदविला. अंतिम सामना सीबीसी बिटको महाविद्यालय व एमजेएम महाविद्यालय, करंजाळी यांच्यात झाला. करंजाळी महाविद्यालयाने २५-२३ व २५-१८ अशा दोन फेऱ्या जिंकून अंतिम सामना जिंकला. या सामन्यात रोहित साळवे, समाधान शेडगे, आकाश परदेशी यांनी उत्तम कामगिरी केली. खेळाडूंना डॉ. दीपक जुंद्रे यांचे मार्गदर्शन लाभले. सचिव पद्माकर गवळी, प्राचार्य डॉ. आर. वाय. बोरसे, प्रा. कृष्णा मोरे, विद्याधर गवळी, काशीनाथ चौधरी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.

Web Title: Karunjali College's success in volleyball competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.