निखळ सत्याच्या शोधासाठी न्याय़ाधिशांचा प्रवास - मृदुला भाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 08:56 PM2019-08-11T20:56:39+5:302019-08-11T21:08:13+5:30

न्यायलयात न्यायदानाचे काम करताना साक्षी पुराव्यांच्या माध्यमातून न्यायाधिशांसमोर सत्याचे विविद पैलू समोर येतात. या वास्तविकतेतील सत्याच्या वेगवेगळ््या बाजूंची पडताळणी करून परीपूर्ण आधार असलेले निखळ सत्य शोधण्यापर्यंतचा प्रवास न्यायाधिशाला करावा लागत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकार यांनी केले. 

The Judges' Journey to the Discovery of the Truth - Mridula Bhatkar | निखळ सत्याच्या शोधासाठी न्याय़ाधिशांचा प्रवास - मृदुला भाटकर

निखळ सत्याच्या शोधासाठी न्याय़ाधिशांचा प्रवास - मृदुला भाटकर

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायाधीशांना घ्यावा लागतो परीपूर्ण सत्याचा शोध सत्यापासून निखळ सत्यापर्यंत न्यायाधिशांचा प्रवास न्यायाधीशाचे काम ईश्वराने दिलेली देणगी

नाशिक : न्यायलयात न्यायदानाचे काम करताना साक्षी पुराव्यांच्या माध्यमातून न्यायाधिशांसमोर सत्याचे विविध पैलू समोर येतात. या वास्तविकतेतील सत्याच्या वेगवेगळ््या बाजूंची पडताळणी करून परीपूर्ण आधार असलेले निखळ सत्य शोधण्यापर्यंतचा प्रवास न्यायाधिशाला करावा लागत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकार यांनी केले. 
शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात रविवारी (दि.११) लेखक तुमच्या भेटीला व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफताना ‘कविता कोर्टातल्या ’ विषयावर त्या बोलत होत्या. व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश एम. एस. बोधनकर, महाराष्ट्र व गोवा बार कौंसीलचे सदस्य अ‍ॅड.जयंत जायभावे, नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, ग्रंथालीचे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर आदि उपस्थित होते. मृदुला पाटकर म्हणाल्या, न्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी ईश्वराने दिलेली देणगी आहे असल्याची शिकवण आपल्याला वडिलांकडून मिळाली. वकिल आणि न्यायाधीशाचे काम वेगवेगळे असून न्यायाधिशाला साक्षिदाराचे वर्तन ओळखता येणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांची न्याय खात्याकडून सेवेची अपेक्षा असते. त्यामुळे न्यायाधीश ही नोकरी नसून ती सेवा आहे ही भावाना न्यायाधिशांनीही जोपासण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्याचप्रमाणे न्यायालयात साक्षीदाराला शपथ देणे हे पवित्र काम असून अशी शपथ देण्याचा मला अधिकार आहे का याविषयी आत्मपरीक्षणही करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

Web Title: The Judges' Journey to the Discovery of the Truth - Mridula Bhatkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.