अंबोली सह.संस्थेच्या चेअरमनपदी जाधव व व्हा.चेअरमनपदी बोडके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 04:32 PM2020-10-21T16:32:51+5:302020-10-21T16:33:25+5:30

त्र्यंबकेश्वर ; त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रथितयश सहकारी संस्था व शेतक-यांच्या प्रगती सिंहाचा वाटा असलेल्या अंबोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक दत्तात्रय जाधव तर व्हा.चेअरमनपदी कृषी उद्योजक तथा प्रगतीशील शेतकरी नवनाथ बोडके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

Jadhav as Amboli co-chairman and Bodke as vice chairman! | अंबोली सह.संस्थेच्या चेअरमनपदी जाधव व व्हा.चेअरमनपदी बोडके !

अंबोली सह.संस्थेच्या चेअरमनपदी जाधव व व्हा.चेअरमनपदी बोडके !

Next
ठळक मुद्दे स्वीकृत संचालक म्हणुन शिवाजी मेढे अशोक मेढे व अ‍ॅड.कृष्णा निवृत्ती मेढे पाटील यांची निवड


त्र्यंबकेश्वर ; त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रथितयश सहकारी संस्था व शेतक-यांच्या प्रगती सिंहाचा वाटा असलेल्या अंबोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक दत्तात्रय जाधव तर व्हा.चेअरमनपदी कृषी उद्योजक तथा प्रगतीशील शेतकरी नवनाथ बोडके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या ठरलेल्या रोटेशन प्रमाणे मावळते चेअरमन वामन मेढे पाटील तर व्हा. चेअरमन भो रु पारधी यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणुक होती.
या निवडणुकी बरोबरच स्वीकृत संचालक म्हणुन शिवाजी मेढे अशोक मेढे व अ‍ॅड.कृष्णा निवृत्ती मेढे पाटील यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या आजवरच्या इतिहासात उच्च शिक्षित चेअरमन लाभल्याने संस्थेचा विकास व भरभराट होईल. अशी अपेक्षा मान्यवर उपस्थितांना केली. या निवडणुकीत प्रक्रिया समयी अ‍ॅड.कैलास मेढेपाटील जेष्ठ शिवसेना नेते मनोहर मेढे पाटील शिवसेना तालुका समन्वयक जेष्ठ नेते समाधान बोडके पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढेपाटील आदी मंडळी आवर्जुन उपस्थित होते. अंबोली सोसायटीला पहिल्यांदाच उच्च शिक्षित व यशस्वी कृषी उद्योजक व्यक्तिमत्त्वाची जोडी लाभल्यामुळे सर्वांनी त्यांच कौतुक व अभिनंदन केले. नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अनेकांनी अभिनंदन करुन सत्कार केला. तर तसेच मावळत्या पदाधिका-यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी मा.चेअरमन अ‍ॅड. श्री. भास्कर मेढेपाटील, सौ. अनुसया लुखाजी बोडके, अ‍ॅड. श्री. शरद मेढेपाटील, भावडु बोडके व सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते. अ‍ॅड. कैलासजी मेढेपाटील यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व शिवसेनेचे ता.उपाध्यक्ष श्री. संजय मेढेपाटील यांनी आभार प्रदर्शन केले. विशेष म्हणजे या संपुर्ण कार्यक्रम प्रसंगी शासकीय नियमा प्रमाणे कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर व फिजिकल डिस्ट न्सिंगचा वापर करण्यात आला.

Web Title: Jadhav as Amboli co-chairman and Bodke as vice chairman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.