‘ते’ २३ रुग्ण म्हणतात, घाबरू नका; मात्र काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:16 PM2020-03-21T23:16:23+5:302020-03-21T23:17:32+5:30

नाशिक : ‘कोरोना आजारापासून घाबरून जाऊ नका, या आजाराला प्रतिबंध नक्कीच करता येऊ शकतो, स्वत:ची अन् इतरांची काळजी घ्या.., आम्ही कोरोनाग्रस्त देशांमधून प्रवास केल्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना विलगीकरण कक्षात उपचार करून घेतले.., नमुन्यांचे सर्व काही रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्यामुळे आता चिंता मिटली’ असे मत कोरोना विलगीकरण कक्षातून उपचार घेऊन घरी गेलेल्या त्या २३ रुग्णांपैकी बहुतांश व्यक्तींनी व्यक्त केले.

'It' says 4 patients, do not panic; But be careful | ‘ते’ २३ रुग्ण म्हणतात, घाबरू नका; मात्र काळजी घ्या

‘ते’ २३ रुग्ण म्हणतात, घाबरू नका; मात्र काळजी घ्या

Next
ठळक मुद्देसर्वांचे नमुने निगेटिव्ह : कोरोना कक्षातून उपचार घेऊन घरी गेलेल्या व्यक्तींशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : ‘कोरोना आजारापासून घाबरून जाऊ नका, या आजाराला प्रतिबंध नक्कीच करता येऊ शकतो, स्वत:ची अन् इतरांची काळजी घ्या.., आम्ही कोरोनाग्रस्त देशांमधून प्रवास केल्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना विलगीकरण कक्षात उपचार करून घेतले.., नमुन्यांचे सर्व काही रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्यामुळे आता चिंता मिटली’ असे मत कोरोना विलगीकरण कक्षातून उपचार घेऊन घरी गेलेल्या त्या २३ रुग्णांपैकी बहुतांश व्यक्तींनी व्यक्त केले.
परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर काहींना सर्दी, खोकल्याचा त्रास उद्भवला तर काहीजण तापाने फणफणले होते. त्यामुळे त्यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. कोरोनाग्रस्त देशांमधून प्रवास केल्यामुळे वैद्यकीय पथकाकडून त्यांना कोरोना विलगीकरण कक्षात संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले, मात्र त्यांच्या घशातील स्रावाच्या नमुन्यांचा अहवाल तपासणीनंतर निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप असे २९ रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना कक्षात दाखल झाले होते. त्यापैकी २३ रुग्णांवर उपचार पूर्ण करून घरी गेले आहेत. एकूण २७ संशयितांचा नमुने अहवाल निगेटिव्ह आला आहे. दोन संशयितांच्या नमुन्यांचा अहवाल अद्याप येणे बाकी असून, सध्या कोरोना विलगीकरण कक्षात केवळ २ ते ३ रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत.
कोरोनाची धास्ती सर्वसामान्यांनी घेतली असून, प्रशासनासह नागरिकदेखील आता खबरदारी घेताना दिसून येत आहे. कोरोना आजार जीवघेणा असला तरी त्यापासून घाबरून जाण्याचे कारण नाही. या आजाराचा फैलाव न होऊ देणे हे पूर्णपणे नागरिकांच्या हाती आहे. जे नागरिक परदेशवारी करून आले असतील त्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयातून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, जेणेकरून स्वत:सह अन्य नागरिकांचाही जीव धोक्यात येणार नाही, असा सल्लाही या २३ व्यक्तींपैकी बहुतांश महिला, पुरुषांसह विद्यार्थ्यांनी दिला.‘कोरोना कक्ष म्हणजे खूप काही दिव्य नाही’कोरोना कक्ष म्हणजे अगदी सामान्यच आहे. केवळ या कक्षात कोणालाही थेट प्रवेश दिला जात नाही. या कक्षात आम्ही जेवणही करत होतो आणि टीव्हीही बघत होतो. कक्षात नियुक्त परिसेविका, परिचारिकांकडून अत्यंत काटेकोरपणे स्वत:ची दक्षता घेत संशयितांच्या आरोग्याची काळजी केली जाते. वेळोवेळी औषधोपचार करत साखर, रक्तदाबाची तपासणीही होते. अत्यंत चांगल्या पध्दतीने या कक्षात तीन ते चार दिवस उपचार मिळाले. त्यामुळे कोरोना कक्ष म्हणजे खूप काही दिव्य आहे, असे नाही.कोरोना विषाणू संसर्ग
काळजी करू नका...सावध रहाबालके, वृद्धांची काळजी घ्या
१) १० वर्षांखालील मुले आणि ५० वर्षांवरील वृद्धांनी काही दिवस घरातच थांबावे.
२) मुले आणि वृद्धांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना संसर्ग होणार नाही यासाठी विशेष दक्षता घ्यावी.
३) वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानुसार औषधोपचार करावेत.कोरोना विषाणू संसर्ग
काळजी करू नका...सावध रहाजनता कर्फ्यूमध्ये सहभाग
१) रविवारी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घराबाहर पडू नका. जनता कर्फ्यूने कोरोनाशी लढा देऊया.
२) सायं. ५ वा. घराच्या दारामध्ये येऊन कोरोनाच्या मुकाबल्यासाठी लढणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, इतर कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन करूया.

Web Title: 'It' says 4 patients, do not panic; But be careful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.