कळविण्यात येते की, कार्यक्र माला येऊ नये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 09:34 PM2020-04-06T21:34:48+5:302020-04-06T21:35:18+5:30

नायगाव : कोरोना.. कोरोना.. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने आज संपूर्ण जग भयभीत करून सोडले आहे. अशा या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी झालेल्या लॉकडाउनमुळे घरातील माणसे एकत्र आली असली तरी सुख आणि दु:खात येणाऱ्या माणसांनाच आता कार्याला न येण्याचे अनोखे आमंत्रण देण्याची वेळ कोरोनाने यजमानांवर आणली आहे.

It is reported that the program should not be returned! | कळविण्यात येते की, कार्यक्र माला येऊ नये !

कळविण्यात येते की, कार्यक्र माला येऊ नये !

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा धसका : सुख-दु:खाच्या कार्यक्र मासाठी असेही आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
नायगाव : कोरोना.. कोरोना.. कोरोना या तीन अक्षरी शब्दाने आज संपूर्ण जग भयभीत करून सोडले आहे. अशा या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी झालेल्या लॉकडाउनमुळे घरातील माणसे एकत्र आली असली तरी सुख आणि दु:खात येणाऱ्या माणसांनाच आता कार्याला न येण्याचे अनोखे आमंत्रण देण्याची वेळ कोरोनाने यजमानांवर आणली आहे.
संपूर्ण जगाला हादरून सोडणाºया कोरोना विषाणूने नागरिकांमध्ये आपली दहशत निर्माण केली आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळे शासनाने संपूर्ण देशभर लॉकडाउन केले आहे.
या लॉकडाउनने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील लोकांनाही चार भिंतीच्या आत थांबण्यास भाग पाडले आहे. हे सर्वांना कठीण वाटत असले तरी त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. कोरोनाच्या निमित्ताने आज कधी नव्हे एवढे दिवस घरातील सर्व सदस्य चोवीस तास आनंदात घालवत आहेत. असे असले तरी अंत्यविधी, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध व विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्र परिवार व आप्तेष्ट जमण्यासाठी निरोप किंवा आमंत्रण देण्याची प्रथा या कोरोनामुळे खंडित झाली आहे.
या संसर्गजन्य रोगामुळे व संचारबंदी कायद्यामुळे सध्या या सर्वच सुख-दु:खाच्या कार्यक्रमांना भाऊबंद सोडून कोणीही उपस्थित राहू नये, असे मेसेज व निरोप देण्याची पद्धत सध्या सर्वत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे सध्या सर्वच कार्यक्रम अतिशय अल्पनागरिकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत.अन्नपाण्याची थांबली नासाडी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे. त्यामुळे पेट्रोल, अन्न व पाण्याच्या होणाºया नासाडीला नक्कीच ब्रेक लागल्याची सुखद चर्चाही ऐकायला येत आहे. त्यामुळे कोरोनाचे विघ्न दूर झाल्यानंतरही सर्वच कार्यक्र म असेच साजरे करण्यात काय हरकत आहे, असा सूर सोशल मीडियातून निघतो आहे.

Web Title: It is reported that the program should not be returned!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.