जाहिरातबाजी करुन उमेदवारी मिळत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 07:14 PM2019-07-12T19:14:15+5:302019-07-12T19:14:37+5:30

छगन भुजबळ : येवल्यातील उमेदवारी मागणाऱ्यांना टोला

It does not get any candidacy by advertising | जाहिरातबाजी करुन उमेदवारी मिळत नाही

जाहिरातबाजी करुन उमेदवारी मिळत नाही

Next
ठळक मुद्देअ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी जाहीरपणे भुजबळांना पत्र लिहित येवल्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याची विनंती करत एकप्रकारे भुजबळ यांना थांबण्याचा सल्ला दिला होता.

येवला : मी कुठे उमेदवारी करावी याबाबतचा निर्णय पक्ष घेईल. येवल्यातून मी उमेदवारी करणार नसेल तर येवल्यात अनेक योग्य उमेदवार आहेत. जाहिरातबाजी करून उमेदवारी मागण्याची पद्धत कुठल्याच पक्षात नाही आणि दबाव आणून उमेदवारी मिळत नाही, असा टोला माजी उपमुख्यमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी इच्छुकांना पत्रकारांशी बोलताना लगावला.
आषाढी एकादशी निमित्त भुजबळ यांनी तालुक्यातील कोटमगाव येथील विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उमेदवारीच्या चर्चेबाबत प्रथमच मौन सोडले. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांचे समर्थक अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी जाहीरपणे भुजबळांना पत्र लिहित येवल्यातून विधानसभेची उमेदवारी देण्याची विनंती करत एकप्रकारे भुजबळ यांना थांबण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर, शिंदे समर्थकांनीही भुजबळ यांना निवेदन देत शिंदे यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. याबाबत भुजबळ यांनी शुक्रवारी (दि.१२) पत्रकारांशी बोलताना सांगितले, मी कुठं उभे राहावे याची मागणी नागरिकांनी करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यांचा मी सन्मान करतो. पक्ष ठरवेल त्या ठिकाणी मी निवडणूक लढविणार आहे. याबाबत सर्व निर्णय पक्ष घेईल. पक्षाकडे उमेदवारी मागताना पक्षाची विशिष्ट प्रक्रि या आहे. त्यासाठी जाहिरातबाजी करून दबाव निर्माण करत उमेदवारी मिळत नाही. येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी अंबादास बनकर यांच्यासह अनेक योग्य उमेदवार आहेत. याबाबत पक्ष निर्णय घेऊन उमेदवारी देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, संजय बनकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, प्रांतिक सदस्य अरु ण थोरात, पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ, कोटमगावच्या सरपंच सोनाली कोटमे, महिला शहराध्यक्ष राजश्री पहिलवान आदी उपस्थित होते.
भुजबळ यांची कबुली  आनंदाची बाब
२००४ च्या निवडणुकीत आमदार छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची जाहीरपणे ढोलताश्याच्या गजरात मीच मागणी केली होती. यावेळेस फरक इतकाच आहे कि मी स्वत:करिता भुजबळ यांचेकडे जाहीर विनंती करून उमेदवारीची मागणी केली आहे. तथापि अंबादास बनकर यांच्यासह राष्ट्रवादीकडे अनेक योग्य उमेदवार असल्याची भुजबळ यांची कबुली समाधानाची व आनंदाची बाब आहे.
- अ‍ॅॅड. माणिकराव शिंदे,जेष्ठ नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

Web Title: It does not get any candidacy by advertising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.