गरजू विद्यार्थ्यांना उडान फाउंडेशन तर्फे विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 03:53 PM2020-09-13T15:53:53+5:302020-09-13T15:55:34+5:30

सिन्नर :- येथील उडान फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडून डुबेरे येथील जनता विद्यालयाच्या 12 अनाथ व गरजू विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा विमा काढण्यात आला. ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजाची देणे लागतो या सेवाभावी वृत्तीने डुबेरे येथील 12 गरजू व अनाथ मुलांचा एक वर्षाचा मेडिक्लेम विमा उतरविण्यासाठीचा धनादेश फाउंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी डुबेरे येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान येवले यांच्याकडे सूपूर्द केला .

Insurance cover by Udan Foundation to needy students | गरजू विद्यार्थ्यांना उडान फाउंडेशन तर्फे विमा संरक्षण

उड्डाण फाउंडेशन कडून अनाथ व गरजू मुलांचा एक वर्षाचा विमा रकमेचा धनादेश डुबेरे येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान येवले यांच्याकडे देताना अध्यक्ष भरत शिंदे यांच्यासह पदाधिकारी.

Next
ठळक मुद्देहा धनादेश देऊन समाजाकडून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न

सिन्नर :- येथील उडान फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडून डुबेरे येथील जनता विद्यालयाच्या 12 अनाथ व गरजू विद्यार्थ्यांचा एक वर्षाचा विमा काढण्यात आला. ज्या समाजात आपण जन्माला येतो त्या समाजाची देणे लागतो या सेवाभावी वृत्तीने डुबेरे येथील 12 गरजू व अनाथ मुलांचा एक वर्षाचा मेडिक्लेम विमा उतरविण्यासाठीचा धनादेश फाउंडेशनचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी डुबेरे येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान येवले यांच्याकडे सूपूर्द केला . हा धनादेश देऊन समाजाकडून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे यावेळी शिंदे म्हणाले.विद्यालयातील एका अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्या विद्यार्थ्याचा इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे .यावेळी सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी संदीप चौधरी ,सुनील निर्मळ, नीलेश गर्जे ,बाळासाहेब खैरनार ,रामहरी शिरसाट, दिनेश पवार ,राजेश गायकवाड ,सत्यजित कळवणकर, शिवाजी घुगे ,शिवाजी लोहट ,सुधीर कुशारे ,भूषण आहेर ,सुनिल खैरनार तसेच विद्यालयाचे जेष्ट शिक्षक एकनाथ खैरनार ,सोमनाथ गिरी ,किरण शिंदे आदी उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार, तालुका संचालक हेमंत नाना वाजे,संस्था शिक्षणाधिकारी डॉक्टर एस . के.शिंदे , शालेय समितीचे अध्यक्ष नारायण वाजे ,उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने आदिसह शालेय समितीचे सदस्य , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे


 

Web Title: Insurance cover by Udan Foundation to needy students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.