कोटमगावमधील कामांची स्वच्छता समितीकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 11:39 PM2020-08-07T23:39:10+5:302020-08-08T01:10:04+5:30

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा समितीकडून कोटमगावची पाहणी करण्यात आली.

Inspection of works in Kotamgaon by Sanitation Committee | कोटमगावमधील कामांची स्वच्छता समितीकडून पाहणी

कोटमगाव येथे ग्रामस्वच्छता अभियान समितीने पाहणी केली त्यावेळी माहिती देताना सरपंच बाळासाहेब म्हस्के व उपस्थित मान्यवर.

Next

एकलहरे : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा समितीकडून कोटमगावची पाहणी करण्यात आली.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छ ग्राम स्पर्धा राज्यभर सुरू आहे. त्याअनुषंगाने शुक्र वारी (दि.७) कोटमगाव येथे समितीने भेट देऊन लोकसहभागातून गावात केलेली स्वच्छतेची कामे व ठेवलेले सातत्य या सर्वांची पाहणी केली. या समितीत त्र्यंबकेश्वर पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी एस. जी. पाठक, बालविकास प्रकल्प अधिकारी ए. डी. दिघोळे, शिक्षणाधिकारी आर. व्ही. शिरसाठ, मेडिकल अधिकारी एम. एस. तायडे, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी डी. एच. राठोड, विस्तार अधिकारी आर. एस. पाटील, नाशिक पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी. एन. सोनवणे, एस. के. सानप यांचा समावेश होता. समितीने ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी, स्वच्छतागृहे, वैयक्तिक स्वच्छतागृहे, आर. ओ. प्लांट, पाणीपुरवठा योजना, आदी भागांची पाहणी पाहणी केली.
सरपंच बाळासाहेब म्हस्के यांनी पाहणी समितीस गावातील केलेली विकासकामे व या विकासकामात लोकसहभागाची साथ यामुळे गावाला मिळालेले विविध पुरस्कार, गावातील लोकांना स्वच्छतेची सवय लागावी यासाठी सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली जनजागृती, प्रबोधन यामुळे स्वच्छतेचे ठेवलेली सातत्य याविषयी माहिती दिली. कमिटीने इतर गावांनीही कोटमगावचा आदर्श घेऊन गावे विकसित करावी, अशी भावना व्यक्त केली.

Web Title: Inspection of works in Kotamgaon by Sanitation Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.