ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:19 AM2021-01-09T01:19:21+5:302021-01-09T01:19:45+5:30

जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली असून, शुक्रवारी तालुका पातळीवर बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्राथमिक स्तर तपासणी करण्यात आली तर काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले. २१३२ प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सुमारे अडीच हजार बॅलेट आणि तितकेच कंट्रोल युनिट यंत्रे लागणार आहेत. ज्या ठिकाणी बॅलेट आणि कंट्रोल युनिटची पडताळणी करण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 

Inspection of voting machines for Gram Panchayat elections | ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची तपासणी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान यंत्रांची तपासणी

Next
ठळक मुद्देपहिला टप्पा: अडीच हजार लागणार बॅलेट युनिट 

नाशिक : जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागली असून, शुक्रवारी तालुका पातळीवर बॅलेट आणि कंट्रोल युनिटची प्राथमिक स्तर तपासणी करण्यात आली तर काही तालुक्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही पार पडले. २१३२ प्रभागांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सुमारे अडीच हजार बॅलेट आणि तितकेच कंट्रोल युनिट यंत्रे लागणार आहेत. ज्या ठिकाणी बॅलेट आणि कंट्रोल युनिटची पडताळणी करण्यासाठी तहसील कार्यालयांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. 
निवडणुकीसाठी लागणारे बॅलेट आणि कंट्रोल युनिट यांची प्रथम स्तर पडताळणी तहसीलदारांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रभाग संख्येनुसार तसेच राखीव कंट्रोल आणि बॅलेटची आवश्यकता  लक्षात घेता दोन्ही मिळून  यंत्रांची तपासणी   करण्यात आली. कंट्रोल तसेच बॅलेट युनिट सुरू करण्यापासून सील करण्यापर्यंत तसेच सॉफ्टवेअर प्रणालीची चाचपणी करण्यात आली. यंत्राच्या पडताळणीतून सुस्थितीतील यंत्रणे मतदान प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आली.    जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी येत्या १५ तारखेला मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडून तयारीला वेग देण्यात आला आहे. 
गेल्या ४ तारखेला अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट झाले आहे. जवळपास दीड हजार उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहेत तर उर्वरित सुमारे अकरा हजार जागांसाठी चुरशीची निवडणूक होणार आहे. माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर  निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली.
नाशिक तालुक्याचे आज प्रशिक्षण 
निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण शनिवार, ९ रोजी सकाळी आयोजित करण्यात आले आहे. गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथे सकाळपासून प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनतळाची व्यवस्था डेांगरे वसतिगृह मैदान येथे करण्यात आलेली आहे. दुसरे प्रशिक्षण पुढील १४ तारखेला तहसील कार्यालयात पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

Web Title: Inspection of voting machines for Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.