कोलती नदीवरील अरुंद पुलामुळे अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 04:46 PM2020-01-18T16:46:59+5:302020-01-18T16:50:47+5:30

देवळा : प्रस्तावित नवीन पुल उभारण्याची मागणी

 Increased difficulty due to narrow bridge over Kolti river | कोलती नदीवरील अरुंद पुलामुळे अडचणीत वाढ

कोलती नदीवरील अरुंद पुलामुळे अडचणीत वाढ

Next
ठळक मुद्देदहा वर्षांपूर्वी माजी मंत्री स्व. ए.टी. पवार यांच्या पुढाकारातून भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी कोलती नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली.

देवळा : देवळा बसस्थानकाकडून दुर्गामाता मंदिरात जाण्यासाठी दहा वर्षांपूर्वी कोलती नदीवर बांधण्यात आलेला पूल अरूंद असल्यामुळे आता तो अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या पाठीमागे कोलती नदीवर प्रस्तावित असलेल्या नवीन पुलाची निर्मिती करून नागरीकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी भाविकांनी तसेच शेतकऱ्यांनी केली आहे.
कोलती नदीच्या काठावर असलेल्या ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात भाविकांची नेहमी गर्दी असते. परंतु कोलती नदीला पाणी वाहत असेल तर भाविकांची मंदिरात जाण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. दहा वर्षांपूर्वी माजी मंत्री स्व. ए.टी. पवार यांच्या पुढाकारातून भाविकांची गैरसोय दूर करण्यासाठी कोलती नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. हा पूल सबमर्सिबल असल्यामुळे त्याला कठडे नाहीत. ह्या पुलाचा लाभ भाविकांबरोबरच मंदिर परीसरात शेतावर वस्ती करून राहत असलेल्या शंभरहून अधिक शेतकऱ्यांना देखील झाला. पावसाळयात नदीला पूर आला तर ह्या शेतकºयांचा गावाशी असलेला संपर्क तूटून जात असे. रूग्णाला दवाखान्यात आणणे, तसेच शेतीमालाची वाहतूक करणे देखील शक्य होत नसे. पुलाच्या निर्मितीमुळे त्यांची मोठी गैरसोय दूर झाली. तसेच मंंदिर परिसरात रविवारी भरणाºया आठवडे बाजारात जाणाºया नागरीकांची व वाहनांची चांगली सोय झाली. परंतु रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी ह्या पुलावर नागरीकांची मोठी गर्दी होते. पूल अरूंद असून पुलाच्या काठावर दोन्ही बाजूनी भाजीपाला विक्र ेते आपला भाजीपाला समोर ठेवून विक्री करत असतात. भाजीपाला घेणारे ग्राहक जागेवरच थांबतात. विक्र ेत्यांच्या व ग्राहकांच्या गर्दीतून मार्ग काढत पुलावरून जावे लागते. यामुळे हया पुलावर येणाºया व जाणाºया ग्राहकांची एकच गर्दी उसळते. खिसेकापूंसाठी हि गर्दी म्हणजे पर्वणीच असते. तसेच मंदीर परीसरात राहणाºया शेतकºयांना त्यांची वाहने गावात आणणे शक्य होत नाही. यामुळे नवीन पुलाची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Web Title:  Increased difficulty due to narrow bridge over Kolti river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक