साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी चोरट्या वृक्षतोडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 02:56 PM2021-05-14T14:56:40+5:302021-05-14T14:57:12+5:30

मुंजवाड : बागलाण तालूक्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर दिमाखात उभा असलेल्या तसेच अवघ्या महाराष्ट्रातील पर्यटक व गिर्यारोहकांचे आकर्षण असलेल्या साल्हेर किल्यावरील वनसंपदेची मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड होत असल्याने किल्ला परिसर दिवसेंदिवस उजाड होत आहे. या वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमी नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

Increased deforestation at the foot of Salher Fort | साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी चोरट्या वृक्षतोडीत वाढ

साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी चोरट्या वृक्षतोडीत वाढ

Next

वनविभागाचे दुर्लक्ष : निसर्गप्रेमी नागरिकात संताप
मुंजवाड : बागलाण तालूक्याच्या पश्चिम भागात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर दिमाखात उभा असलेल्या तसेच अवघ्या महाराष्ट्रातील पर्यटक व गिर्यारोहकांचे आकर्षण असलेल्या साल्हेर किल्यावरील वनसंपदेची मोठ्या प्रमाणात चोरटी वृक्षतोड होत असल्याने किल्ला परिसर दिवसेंदिवस उजाड होत आहे. या वृक्षतोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याने निसर्गप्रेमी नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे.

साल्हेर किल्याच्या पायथ्याशी वन विभागाचे कार्यालय असून या ठिकाणी पर्यटकांसाठी विश्रामगृहात निसर्ग परिचय केंद्रही उभारले आहे. तरीदेखील या परिसरातील वनराई चोरटया मार्गाने नामशेष करण्याचा प्रयत्न होत असतांना वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यामुळे पर्यटकांमध्ये तसेच निसर्गप्रेमीमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
साल्हेर किल्याच्या परिसराचा विकास व्हावा तसेच पर्यटकांची वर्दळ वाढून या परिसरातील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प केला आहे. तत्पूर्वीच या परिसरातील जंगलाची छुपी वृक्षतोड होत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. किल्याच्या पायथ्याशी भवानी मातेचे पुरातन मंदिर असून या परिसरात त्या काळी असलेल्या वसाहतीचे अवशेष भग्न अवस्थेत त्याची साक्ष देत शेवटच्या घटका मोजत आहेत. जून्या वसाहतीच्या घरांमध्ये आज मोठमोठी आंबा, चिंच, जांभूळ, सादडा तसेच करवंदीच्या जाळी वाढल्या आहेत. या जाळींमध्ये घरांचे अवशेष, पाण्याची विहीर, दळणाचे जाते नजरेस पडतात. या परिसरातील आंबे दिल्लीच्या बादशाहास खास नजराना म्हणून पाठवला जात असे. आजही किल्लाच्या पायथ्याशी अवाढव्य अशी आम्रवृक्षाची झाडे पहावयास मिळतात. या आंब्यांना खास गोडी आहे. परंतू चोरट्या वृक्षतोडीमुळे या भागातील वनसंपदा वन विभागाच्या अनास्थेमुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दोन राज्यांच्या सीमेवर असलेला हा दुर्गम भाग आहे. संपूर्ण आदीवासी परिसर असून स्वयंपाकासाठी लाकडी सरपणाचा उपयोग मोठया प्रमाणात होत असल्यामुळेही वृक्षतोड नेहमीचीच झाली आहे. सरपणासाठी केली जाणारी वृक्षतोड थांबावी यासाठी या भागातील रहिवाशांना शासनाकडून मोफत गॅस वाटप करण्यात आले. त्याचा वापर होतो की नाही याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. वनविभागाने वेळीच लक्ष देऊन ही वनसंपदा वाचवावी, अशी मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.
कोट...
ऐतिहासीक साल्हेर, मुल्हेर किल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पुरातन वृक्ष असून या वृक्षांची अशीच लुट सुरु राहिल्यास हा परिसर बोडका होण्यास वेळ लागणार नाही. हा वारसा जपण्याची स्थानिक रहिवाशांसह वन विभागाचीही जबाबदारी आहे. वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन वृक्षतोड थांबवावी.

- राहुल पाटील, नगरसेवक, सटाणा
कोट...

साल्हेर किल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या वृक्षतोडीचा प्रकार संतापजनक असून ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यावर आळा घालण्यात येईल. येथील पन्नास एकरात भव्य शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प आमदारांनी केला आहे. शिवसृष्टी निर्माण झाल्यानंतर वृक्षतोडीलाही आळा बसेल.
- बिंदूशेठ शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप किसान सेल, सटाणा

Web Title: Increased deforestation at the foot of Salher Fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक