साथीच्या रु ग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:37 PM2019-10-19T23:37:42+5:302019-10-20T00:19:56+5:30

कळवण : तालुक्यातील सावरपाडा गावात गेल्या दोन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून औषधोपचार करत आहे. गंभीर रुग्णांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

Increase in the amount of partner | साथीच्या रु ग्णांत वाढ

साथीच्या रु ग्णांत वाढ

Next
ठळक मुद्दे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : तालुक्यातील सावरपाडा गावात गेल्या दोन दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा झाल्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा गावात तळ ठोकून औषधोपचार करत आहे. गंभीर रुग्णांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.
पुनंद धरणातून सटाणा शहरासाठी पाइपलाइनद्वारे पाणी देण्यासाठी सुरू असलेल्या खोदकामात ठेकेदाराच्या निष्काळजी-पणामुळे सावरपाडा गावात पाणीपुरवठा करणारी गावांतर्गत जलवाहिनी फुटली व या ठिकाणी खड्डा तयार होऊन दूषित पाणीपुरवठा झाला. यामुळे गावातील १२० नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गुरुवारी (दि. १७) गॅस्ट्रोचे १०० रु ग्ण होते, त्यात शुुक्रवारी (दि. १८) २० रुग्णांची वाढ झाली आहे. ६ रुग्णांना नाशिक जिल्हा रु ग्णालयात, तर १४ रु ग्णांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असली तरी गुरुवारी ६० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. आजमितीस सावरपाडा येथील मराठी शाळा, आरोग्य केंद्रात १७, नाशिक उपजिल्हा रु ग्णालयात ७, तर कळवण उपजिल्हा रु ग्णालयात ३६ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. आज रु ग्णसंख्या कमी झाली आहे. जुने ६० रु ग्ण शंभर टक्के बरे झाले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आली आहे. गावातील परिस्थिती लक्षात घेता आरोग्य यंत्रणा २४ तास सज्ज आहे.
- डॉ. सुधीर पाटील,
तालुका आरोग्य अधिकारी, कळवण

Web Title: Increase in the amount of partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.