निफाडला हार-कडे संपल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 09:26 PM2021-04-13T21:26:54+5:302021-04-14T01:09:21+5:30

निफाड : गुढीपाडव्यासाठी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेले साखरेपासून बनवलेले हार-कडे सोमवारीच संपल्याने शहर व परिसरातील बऱ्याच नागरिकांची निराशा झाली.

Inconvenience due to Niphad's defeat | निफाडला हार-कडे संपल्याने गैरसोय

निफाडला हार-कडे संपल्याने गैरसोय

googlenewsNext
ठळक मुद्देआदल्या दिवशीच हार-कडे संपल्याने अनेकांची निराशा

निफाड : गुढीपाडव्यासाठी विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेले साखरेपासून बनवलेले हार-कडे सोमवारीच संपल्याने शहर व परिसरातील बऱ्याच नागरिकांची निराशा झाली.

गुढीपाडव्याला हार-कड्यांचे मोठे महत्त्व आहे. दरवर्षी गुढीपाडवा सणाच्या तीन-चार दिवसआधी निफाड शहरात हार-कडे विक्रीची दुकाने मोठ्या स्वरुपात लागत असतात. हार -कडे विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होत असते, मात्र यावर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच हार-कडे संपल्याने अनेकांची निराशा झाली. मागील वर्षी झालेले नुकसान लक्षात घेता यावर्षी शहरातील विक्रेत्यांनी नाशिक व इतर ठिकाणांहून दरवर्षीपेक्षा निम्मेच हार-कडे विक्रीसाठी आणले होते. यावर्षीसुद्धा कोरोनाचा कालखंड असूनही नागरिकांचा हार-कडे खरेदी करण्याकडे मोठा कल दिसून आला. यावर्षी हार-कड्यांचे दर वाढलेले होते. साखरेचे वाढलेले भाव, हार-कडे बनवण्यासाठी लागणाऱ्या मजुरांची मजुरी, गॅस सिलिंडरचे वाढलेले दर यामुळे हार-कड्यांचे दरही वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: Inconvenience due to Niphad's defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.