विज्ञान साहित्यात जाणवते मराठीचे अपूर्णत्व : डाॅ. जयंत नारळीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 01:49 AM2021-12-04T01:49:45+5:302021-12-04T01:50:23+5:30

विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे महत्त्वाचे मूलभूत सिद्धांत या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे या शतकाच्या उत्तरार्धात मिळाली. त्यामुळे मराठीचे अपूर्णत्व जास्त कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान साहित्याबाबतीत, अशी खंत ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. नाशकात सांयकाळी संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपतकार’ विश्वास पाटील, पसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

Incompleteness of Marathi is felt in science literature: Dr. Jayant Narlikar | विज्ञान साहित्यात जाणवते मराठीचे अपूर्णत्व : डाॅ. जयंत नारळीकर

विज्ञान साहित्यात जाणवते मराठीचे अपूर्णत्व : डाॅ. जयंत नारळीकर

Next
ठळक मुद्दे अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली खंत

कुसुमाग्रजनगरी, नाशिक : विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे महत्त्वाचे मूलभूत सिद्धांत या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे या शतकाच्या उत्तरार्धात मिळाली. त्यामुळे मराठीचे अपूर्णत्व जास्त कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान साहित्याबाबतीत, अशी खंत ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. नाशकात सांयकाळी संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपतकार’ विश्वास पाटील, पसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कुठल्याही भाषेतील साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा कोणताही विषय असाे, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ‘ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही’ इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे, असेही डॉ. नारळीकर यांनी नमूद केले.

विज्ञान साहित्य कशास म्हणावे, याचा ऊहापोह करताना डॉ. जयंत नारळीकर म्हणाले, वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात धरत नाही. परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन. अर्थात, एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी मी विज्ञान साहित्य म्हणून मानली तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये, असेही डॉ. नारळीकर यांनी स्पष्ट केले.

विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. विज्ञानाची ओळख जनसामान्यांना करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली. फॅरॅडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नांतून जन्माला आलेली विज्ञान संस्था रॉयल इन्स्टिट्यूशन ते काम बजावीत आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.

शिवरायांच्या गडकिल्ल्यांच्या स्मृती जपणे हेच कर्तव्य !: विश्वास पाटील 

 शिवरायांच्या स्मारकाचा विचार करताना तो अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा करण्याचा विचार हा आक्रस्ताळेपणा आणि अविचार ठरेल. त्यापेक्षा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गडकिल्ल्यांच्या रुपात असलेल्या पाऊलखुणा जपणे, हे आपले कर्तव्य असल्याचे पानिपतकार विश्वास पाटील यांनी सांगितले.

उद्घाटकाच्या भूमिकेतून केलेल्या भाषणात पाटील बोलत होते. विश्वास पाटील यांनी महाराष्ट्राचा इतिहास आणि नाशिकच्या ऐतिहासिक पाउलखुणांचा धांडोळा घेतला. मुख्यमंती उद्धव ठाकरे यांचा संदेश यावेळी वाचून दाखवण्यात आला. 

सत्य लिहिणार्यांना राष्ट्रविरोधी ठरवले जाते : जावेद आख्तर

सक्षम लोकशाहीसाठी ज्याप्रमाणे संसद, शासन, विरोधक आवश्यक असतात, त्याचप्रमाणे सत्य बोलणारे, स्वतंत्र लिहिणारे साहित्यिकही गरजेचे असतात. त्यामुळे साहित्यिकांकडे स्वातंत्र्य असायला हवे असे प्रतिपादन जावेद अख्तर यांनी केले. ते म्हणाले, एखादा लेखक जोपर्यंत काल्पनिक लिहतो, कौतुक करतो तोपर्यंत तो चांगला वाटतो. मात्र तो सत्य लिहायला, सांगायला लागतो तेव्हा तेव्हा त्याला पूर्वी वाईट ठरवले जात, आता त्याला राष्ट्रविरोधी ठरवले जाते. राज्यकर्ते आणि लोकांना काल्पनिक लिहलेले आवडते. मात्र रस्त्यावरील लढाई लढणारे आणि प्रश्न उपस्थित करणारे नको असतात. सध्या सत्य लिहणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. साई ची गाणी साहित्यिकांनी प्रेम कथा लिहिण्याऐवजी सत्य आणि हक्कासाठी लेखन केले पहिजे. साहित्यिकानी कोणताही विचार न करता , पक्षनिष्ठा पाळत न बसता केवळ देशहितासाठी लिहिले पाहिजे, ही संख्या कमी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Incompleteness of Marathi is felt in science literature: Dr. Jayant Narlikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.