सायखेडा येथे केंद्रस्तरीय वाचनालयाचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 09:07 PM2021-02-01T21:07:26+5:302021-02-02T00:49:20+5:30

सायखेडा : जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय बालस्नेही वाचनालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र मोगल यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of Central Library at Saykheda | सायखेडा येथे केंद्रस्तरीय वाचनालयाचे उद‌्घाटन

सायखेडा येथे केंद्रस्तरीय वाचनालयाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना राजेंद्र मोगल. समवेत जगन कुटे, ओंकार वाघ व मान्यवर.

Next
ठळक मुद्देमुलांमध्ये वाचनप्रेम वाढविण्यासाठी विविध उपक्रम

सायखेडा : जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरीय बालस्नेही वाचनालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र मोगल यांच्या हस्ते करण्यात आले.

सोशल मीडियाच्या काळात लोप पावत चाललेली वाचन संस्कृती विद्यार्थ्यांनी जोपासावी, पालकांनी मुलांमध्ये वाचनप्रेम वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे, असे मोगल यांनी उद‌्घाटनपर भाषणात सांगितले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून निफाड पंचायत समितीचे माजी सदस्य जगन कुटे, सायखेड्याचे माजी सरपंच घनश्याम जोंधळे, केंद्रप्रमुख ओंकार वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

उपक्रमाच्या समन्वयक पूजा भिल्लारे, वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापक सीमा चव्हाण यांनी, तर सूत्रसंचालन नवनाथ सुडके यांनी व माणिक मुरकुटे यांनी आभार मानले.

 

Web Title: Inauguration of Central Library at Saykheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.