इगतपुरी तालुका वारकरी मंडळाची कार्यकारीणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 05:54 PM2020-09-19T17:54:36+5:302020-09-19T17:55:43+5:30

नांदूरवैद्य : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या साकुरफाटा येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने इगतपुरी तालुका वारकरी मंडळाच्या कार्यकारीणीची सभासद नियुक्ती करण्यात आली असून यावेळी तालुक्यातील सर्व वारकरी सभासदांचा नवनिर्वाचित वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल महाराज लंगडे यांच्या हस्ते पंढरीनाथ महाराज सहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

Igatpuri taluka Warkari Mandal executive announced | इगतपुरी तालुका वारकरी मंडळाची कार्यकारीणी जाहीर

साकुरफाटा येथील वारकरी मंडळाचे पदाधिकारी यांचा सत्कारप्रसंगी तालुकाध्यक्ष विठ्ठल महाराज लंगडे, कचरु महाराज कानेटे, भास्कर महाराज रसाळ, तालुकाध्यक्ष कैलास महाराज तांबे व इतर.

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनापासून वाचविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नेहमीच काळजी घेण्याचे आवाहन

नांदूरवैद्य : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या साकुरफाटा येथे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने इगतपुरी तालुका वारकरी मंडळाच्या कार्यकारीणीची सभासद नियुक्ती करण्यात आली असून यावेळी तालुक्यातील सर्व वारकरी सभासदांचा नवनिर्वाचित वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष विठ्ठल महाराज लंगडे यांच्या हस्ते पंढरीनाथ महाराज सहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साकुरफाटा येथील साईसृष्टी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्र मात सर्व वारकरी सांप्रदायातील पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. आजपर्यंत वारकरी संप्रदायाने तालुक्यातील वारकरी प्रथा जिवंत ठेवत वार्षिक दिंडी सोहळे तसेच इतर धार्मिक कार्यक्र म अत्यंत साधेपणाने विधीवत पूजन करत पार पाडले असून यापुढील काळात देखील कोरोनापासून वाचविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नेहमीच काळजी घेण्याचे आवाहन इगतपुरी तालुका वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, जिल्हा अध्यक्ष निवृत्ती महाराज रायते, सह जिल्हा अध्यक्ष भास्कर महाराज रसाळ, जिल्हा समिती सदस्य कांचन जगताप, नाशिक तालुकाध्यक्ष कैलास महाराज तांबे, मंगेश निकम, बाळासाहेब महाराज शिरसाठ, पूंजाराम महाराज गाढवे, पंढरीनाथ महाराज सहाणे आदींसह तालुक्यातील वादक, गायक, तसेच प्रबोधनकार उपस्थित होते.

अखिल भारतासह परदेशात वारकरी महामंडळाची स्थापना झाली असून या सांप्रदायाचे कार्य अविविरत सुरू आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून संतांचे विचार, शिकवण, स्त्री-पुरु ष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन आदी संतानी दिलेल्या शिकवणीनुसार कार्य केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मदतीचे कार्य केले असून यापुढील काळात देखील हे कार्य सुरूच राहील.
- प्रकाश महाराज बोधले. राष्ट्रीय अध्यक्ष, वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य.
 

Web Title: Igatpuri taluka Warkari Mandal executive announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.