याज्ञवल्क्यांची मूर्ती नवनिर्मितीची प्रेरणा देणारी: सच्चीदानंद शेवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 12:05 AM2020-02-29T00:05:14+5:302020-02-29T00:05:36+5:30

याज्ञवल्क्यांची मूर्ती मनाला प्रसन्नता देणारी असून, त्यातून सर्वांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल. केवळ मौखिक परंपरेद्वारा वेदांच्या शिक्षणाची परांपरा आजवर वैदिकांनी जपून ठेवली आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य सच्चीदानंद शेवडे महाराज यांनी केले.

The idols of the sacrificial animals inspire the renovation | याज्ञवल्क्यांची मूर्ती नवनिर्मितीची प्रेरणा देणारी: सच्चीदानंद शेवडे

शुक्ल यजुर्वेद मंदिरात महर्षी याज्ञवल्क्य ऋषींच्या मूर्ती अनावरण सोहळ्याप्रसंगी सच्चीदानंद शेवडे, स्वामी संविदानंद सरस्वती, भक्तिचरणदास, महापौर सतीश कुलकर्णी, सतीश शुक्ल, भानुदास शौचे.

googlenewsNext
ठळक मुद्देऋषींच्या मूर्तीचे अनावरण

पंचवटी : याज्ञवल्क्यांची मूर्ती मनाला प्रसन्नता देणारी असून, त्यातून सर्वांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळेल. केवळ मौखिक परंपरेद्वारा वेदांच्या शिक्षणाची परांपरा आजवर वैदिकांनी जपून ठेवली आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य सच्चीदानंद शेवडे महाराज यांनी केले.
शुक्ल यजुर्वेदीय माध्यादिन संस्थेच्या यजुर्वेद मंदिरात शुक्रवारी याज्ञवल्क्य ऋषींच्या संगमरवरी मूर्तीचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सतीश कुलकर्णी, कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, महंत भक्तिचरणदास, अविनाश भिडे, पुरोहित संघ अध्यक्ष सतीश शुक्ल आदी उपस्थित होते.
शेवडे पुढे म्हणाले, वैदिक काळात ज्ञानाच्या चरमसीमेचा वैभवशाली काळ भारतवर्षांनी बघितला इंग्रजांनी या वेदाचा विकृत अर्थ लावण्याचा प्रयत्न केला होता. नवीन घडविण्याची प्रेरणा आपल्याला याज्ञवल्क्यांच्या चरित्रातून मिळते असे त्यांनी शेवटी सांगितले. भानुदास शौचे यांनी प्रास्ताविक तर अनिल देशपांडे यांनी स्वागत केले. वैभव दीक्षित यांनी आभार मानले.
यावेळी विजय जोशी, बाबूराव धारणे, श्रीकांत गायधनी, लक्ष्मण सावजी, पवन भगूरकर, बापू सोनवणे, चंद्रकांत महाजन, प्रमोद मुळे, राजन कुलकणी, अमोल जोशी, शरद कुलकर्णी, सुभाष भणगे, वंदना देशपांडे, ज्ञानेश देशपांडे उपस्थित होते.
दुर्मीळ पद्धतीची मूर्ती
कै. श्रीकृष्ण शास्त्री गोडसे, लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या फोटोवरून याज्ञवल्क्य ऋषींची मूर्ती बनविण्यात आली आहे. सदर मूर्ती दुर्मीळ आणि तीन फुटांची बैठी व ३० किलो वजनाची संगमरवरी आहे. शुक्ला यजुर्वेदीय ब्राह्मण संस्थेचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण झाले आहे.

Web Title: The idols of the sacrificial animals inspire the renovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.