पत्नीची हत्या करून पतीचीही आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 01:51 AM2020-01-29T01:51:43+5:302020-01-29T01:54:37+5:30

चांदवड : तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीवर कुºहाडीने वार करत तिला ठार केल्यानंतर मोटारसायकलने जात वाहनासमोर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन बकाजी कडनोर (४२) आणि सुनीता नितीन कडनोर (३७) असे या दांपत्याचे नाव आहे.

Husband commits suicide by killing his wife | पत्नीची हत्या करून पतीचीही आत्महत्या

पत्नीची हत्या करून पतीचीही आत्महत्या

Next
ठळक मुद्दे मोटारसायकलने जात वाहनासमोर आत्महत्या केल्याची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : तालुक्यातील दहेगाव येथील शेतकऱ्याने कौटुंबिक वादातून पत्नीवर कुºहाडीने वार करत तिला ठार केल्यानंतर मोटारसायकलने जात वाहनासमोर आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन बकाजी कडनोर (४२) आणि सुनीता नितीन कडनोर (३७) असे या दांपत्याचे नाव आहे.
चांदवड तालुक्यातील दहेगाव येथील सुनीता कडनोर शिवारात लकडे मळा पाटसरी येथे स्वत:च्या शेतात कांदे लागवड करीत होती. सुनीता रोप उपटत असताना अचानक नितीन कडनोर याने पाठीमागून येऊन तिच्या डोक्यात कुºहाडीने तसेच अंगावर सपासप वार केले. वर्मी घाव लागल्याने सुनीता ही जागीच गतप्राण झाली. त्यानंतर नितीन याने शेतातून पळ काढला आणि मनमाड - मालेगाव महामार्गावर मालेगावकडे मोटरसायकलने जात असताना मालेगावहून मनमाडकडे येणाºया वाहनाच्या समोर जाऊन नितीन याने आत्महत्या केली.
या घटनेची माहिती चांदवड पोलीस स्टेशनला मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तर तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय चांदवड येथे पाठविण्यात आले. मयत दांपत्याच्या पश्चात आईवडील, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडला असावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
नितीन हा नेहमीच किरकोळ कारणावरुन वाद घालत असल्याचीही चर्चा होती.

Web Title: Husband commits suicide by killing his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.