तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 08:58 PM2020-03-23T20:58:50+5:302020-03-24T00:17:52+5:30

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.

Hunger time on Tamasha artists | तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ

Next
ठळक मुद्देकोरोना : गावांच्या यात्रा रद्द; कोट्यवधींचा फटका

जळगाव नेऊर : कोरोना व्हायरसचा तमाशा कलावंतांना फटका बसला असून, चैत्र महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा असतात; पण याच महिन्यात कोरोना व्हायरसची साथ पसरू लागल्याने कला सादर करण्यास शासनाने मनाई केल्याने तमाशाचे फड एकाच जागेवर उभे असून, यात्रा रद्द झाल्या आहेत. येवला तालुक्यातील पुरणगाव येथे गेल्या महिन्यात नारायणगावकर तमाशा मंडळाचा तमाशा झाला होता. कोरोनाचे संकट आले नसते तर कदाचित गुढीपाडव्यादरम्यान होणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त तमाशांचे सादरीकरण झाले असते. परंतु कोरोनामुळे या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे फ डांचे मालकदेखील अडचणीत आले आहेत.
मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रांची गजबज असते तसेच ग्रामीण भागांमध्ये शेतकरीवर्गही कामे उरकून सामाजिक व धार्मिक कामांमध्ये सहभाग घेत असतो; पण सध्या देशासह राज्यातही कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने ठिकठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून बाजारपेठा, मॉल, शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.
या कोरोना व्हायरसचा फटका तमाशा कलावंत व फडमालकाला बसत असून, उपासमारीची वेळ आली आहे.
लोकनाट्य तमाशा ही जिवंत कला आजही तग धरून आहे. ग्रामस्थांचे मनोरंजन करणे आणि त्यातून मिळालेल्या मोबदल्यातून उदरनिर्वाह करणे हे चक्र अनेक वर्षापासून चालू आहे, मात्र व्याजाच्या पैशाने कलाकाराला दिलेली उचल, त्यांचा रोजचा खर्च, गुंतवलेले भांडवल, मालक आणि कलाकार दोन्ही अडचणीत सापडले आहे तेव्हा शासनाने अशा स्थितीत आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकाराकडून केली जात आहे.कोरोना व्हायरसमुळे तमाशा कलावंतांचे फार मोठे नुकसान झाले असून, काही कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दसºयापासून ते गुढीपाडव्यापर्यंत तिकिटावर खेळ चालतो; पण आता सध्याच्या दीड महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात सीझन असतो. त्यामुळे उचललेले कर्ज कसे फेडायचे, तेव्हा शासनाने तात्काळ मदत घ्यावी नाहीतर पुढील वर्षी तमाशा फड उभे राहणार नाही.
-मोहित नारायणगावकर, संचालक, विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ

Web Title: Hunger time on Tamasha artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.