जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 04:18 PM2020-08-09T16:18:34+5:302020-08-09T16:20:14+5:30

सटाणा : तालुक्यातील जयपूर येथे पावसामुळे घर कोसळून दोन लाख रु पयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत जावितहानी झाली नसून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

House collapses in Jaipur; Loss of two lakhs | जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान

जयपूर येथे घर कोसळले; दोन लाखांचे नुकसान

googlenewsNext

तालुक्यातील मोसम खोऱ्यात वरु णराजा चांगलाच प्रसन्न आहे. समाधानकारक पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी काही ठिकाणी अती पावसामुळे मातीची घरे धोकेदायक बनली आहेत. जयपूर येथील शेतकरी दिलीपसिंग रंगराव खैरनार हे आपल्या कुटुंबियांसमवेत शेतात गेले असता पावसामुळे अचानक त्यांच्या घराची भिंत कोसळल्याने घरातील संसारोपयोगी वस्तू, धान्य आदीचे नुकसान झाले. भीज पावसामुळे संपूर्ण छत कोसळले असून खैरनार यांचा संसार उघड्यावर पडला आहे. दरम्यान, तलाठी व मंडळ अधिकारी खरे यांनी तात्काळ पंचनामा करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर केला आहे. लवकरच नैसर्गिक आपत्ती म्हणून भरपाईसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी सांगितले.

Web Title: House collapses in Jaipur; Loss of two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.