होमिओपॅथी तज्ज्ञ साबद्रा यांना पीएचडी प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:29 AM2019-10-24T00:29:08+5:302019-10-24T00:30:19+5:30

कॉन्फेडरेशन आॅफ इंटरनॅशनल अ‍ॅक्रिडेशन कमिशन (सीआयएसी) ग्लोबल, अ‍ॅझटेका विद्यापीठ, मेक्सिको यांच्या वतीने नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या सातव्या ‘इंटरनॅशनल एज्युकेशन फोरम २०१९ ’ या दीक्षांत सोहळ्यात नाशिक येथील होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉ. राजेंद्र साबद्रा यांना पीएच.डी. प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

 Homeopathy specialist provided to Ph.D. | होमिओपॅथी तज्ज्ञ साबद्रा यांना पीएचडी प्रदान

होमिओपॅथी तज्ज्ञ साबद्रा यांना पीएचडी प्रदान

Next

नाशिक : कॉन्फेडरेशन आॅफ इंटरनॅशनल अ‍ॅक्रिडेशन कमिशन (सीआयएसी) ग्लोबल, अ‍ॅझटेका विद्यापीठ, मेक्सिको यांच्या वतीने नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या सातव्या ‘इंटरनॅशनल एज्युकेशन फोरम २०१९ ’ या दीक्षांत सोहळ्यात नाशिक येथील होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉ. राजेंद्र साबद्रा यांना पीएच.डी. प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी सीआयएसीचे प्रमुख डॉ. जी. डी. सिंग आणि राकेश कपूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी होमिओपॅथीमधील योगदानासाठी डॉ. साबद्रा यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. यावेळी डॉ. साबद्रा यांनी होमिओपॅथी उपचारांकडे रुग्ण वळू लागले आहेत. रुग्णांचा होमिओपॅथीकडे वाढता ओघ पाहता भविष्यात होमिओपॅथी उपचारांना आणखी मागणी वाढेल, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. नाशिकमध्ये १९८४ पासून डॉ. साबद्रा कार्यरत आहेत. त्यांना डॉ. हाहनेमान जीवनगौरव पुरस्कार, नाशिक होमिओपॅथीक संघटनेकडून एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

Web Title:  Homeopathy specialist provided to Ph.D.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.