नामपूरला चिनी साहित्याची होळी; शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:28 PM2020-06-19T22:28:27+5:302020-06-20T00:25:32+5:30

लडाखमधील बलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीन व चिनी वस्तूंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नामपूर येथे चिनी साहित्याची होळी करण्यात आली. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Holi of Chinese literature at Nampur; Tribute to the martyred soldiers | नामपूरला चिनी साहित्याची होळी; शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

नामपूर येथे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. याप्रसंगी विनोद सावंत, बापू जगताप, कैलास चौधरी, सचिन अहिरराव, विठ्ठल मगजी, समीर सावंत, सागर नेर, चारु दत्त खैरनार आदी.

Next

नामपूर : लडाखमधील बलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. त्यात २० भारतीय सैनिक शहीद झाले. या घटनेने संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात चीन व चिनी वस्तूंविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नामपूर येथे चिनी साहित्याची होळी करण्यात आली. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
चीनला धडा शिकविण्यासाठी चिनी वस्तूंचा बहिष्कार टाकण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तर यापुढे चिनी वस्तू वापरणार नाही व वापरू देणार नाही अशी शपथ देण्यात आली. दैनंदिन जीवनात चिनी वस्तूंचा वापर आपण अधिक करीत असून, जीवनावश्यक वस्तू यात साबण, पावडर, टूथपेस्ट, मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप, घड्याळ अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर आपण सर्रास करत आलो आहोत. चिनी वस्तू वापरून चीनला आपण आर्थिक दृष्टीने मजबूत करत आलो आहोत, परंतु चीन भारताशी सलोखा न ठेवता भारताच्या सीमेलगतचा भूभाग बळकविण्यासाठी नेहमी दगाफटका करीत आहे. बलवान खोºयातील सैनिकांशी केलेला दगाफटका भारतीय कदापि सहन करणार नाही. भारतात येणाºया चिनी वस्तंूवर बहिष्कार टाकल्याचे नामपूरकरांनी सांगितले. यावेळी विनोद सावंत, शरद नेरकर, बापू जगताप, नारायण सावंत, सचिन अहिरराव, चारुदत्त खैरनार, समीर सावंत, लखन सावंत, शरद खैरनार, विठ्ठल मगजी, किरण सावंत, प्रभू सोनवणे, चेतन चौधरी, कैलास चौधरी, दिगंबर चौधरी, गणेश खरोटे, अदनान पठाण आदी उपस्थित होते.

Web Title: Holi of Chinese literature at Nampur; Tribute to the martyred soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.