जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:10 AM2020-03-10T00:10:28+5:302020-03-10T00:10:49+5:30

नाशिक : जिल्ह्यात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला़ काही ठिकाणी लाकूड व गोवऱ्यासोबत दुगुणांची होळी करण्यात आली़

Holi is celebrated in the traditional manner in the district | जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा

जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा

Next
ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी होळीभोवती नृत्याच्या आनंद लुटला.

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला़ काही ठिकाणी लाकूड व गोवऱ्यासोबत दुगुणांची होळी करण्यात आली़
मुख्याध्यापक सुजाता तनपुरे व शिक्षक यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. किरण खैरनार यांनी होळी सणाचे महत्त्व समजावून सांगितले, तर गोरख सानप यांनी पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांचा वापर करून धूलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्याचा संदेश दिला.
याप्रसंगी होळीत अर्पण करावयाच्या शेणाच्या प्रत्येक गोवरीवर राग, लोभ, अंधश्रद्धा, अज्ञान, निराशा, आळस, भ्रष्टाचार, गैरसमज, मत्सर, तिरस्कार, जात-पात, भेदभाव, भांडण, हेवे-दावे, तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट, दारू, शिव्या, अस्वच्छता यासारखे संदेश लिहून त्यांचे दहन करण्यात आले. याप्रसंगी विविध गीतांवर विद्यार्थ्यांनी होळीभोवती नृत्याच्या आनंद लुटला.

ओझर : येथे कंसारा समाजाने दरवर्षी प्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक होळीची विधिवत पूजा केली तर ही होळी पेटल्यानंतर गावातील इतर होळ्या पेटतात. ठिकठिकाणी गवरीची रास रचली जाते. गावातले होळी वाले टेंभा घेउन मोठ्या होळीवर जमतात. मोठी होळी पेटली की तिच्या ज्वालामध्ये टेंभा पेटवला जातो आणि तो पेटलेला टेंभा घेउन युवा मंडळी आपापल्या होळोकडे धाव घेतात. आपल्या गल्लीतली, भागाची होळी पेटवतात. मानोरी : येथे होळी सणाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेनुसार चालत आलेल्या होळी सणाला गावातील हनुमान मंदिरासमोर सर्व प्रकारच्या झाडांचे लाकूड व शेणाच्या गोवºया एकत्रित करून रात्री होळी पेटविण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी होळीला प्रदक्षिणा घालून व नैवेद्य दाखवून सामुदायिक दर्शन घेतले गेले.

Web Title: Holi is celebrated in the traditional manner in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.