राज्यात नोंदली गेली सर्वाधिक विजेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:55 AM2020-02-21T01:55:46+5:302020-02-21T01:57:33+5:30

नाशिक : उन्हाळा सुरू होताच विजेच्या मागणीत वाढ होते, परिणामी महावितरणाला तातडीचे भारनियमनही करावे लागते. गेल्या बुधवारी राज्यातील विजेची ...

 The highest electricity demand was recorded in the state | राज्यात नोंदली गेली सर्वाधिक विजेची मागणी

राज्यात नोंदली गेली सर्वाधिक विजेची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देमागणीचा उच्चांक : २१ हजार ५७० मेगावॉटमेगावॉटने सदर मागणी जास्त आहे.

नाशिक : उन्हाळा सुरू होताच विजेच्या मागणीत वाढ होते, परिणामी महावितरणाला तातडीचे भारनियमनही करावे लागते. गेल्या बुधवारी राज्यातील विजेची मागणी २१ हजार मेगावॉटवर पोहोचली होती. आजवरच्या मागणीचा उच्चांक नोंदला गेला. विशेष म्हणजे महावितरणने सदर मागणीनुसार विजेचा पुरवठाही केला.
उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते हा आजवरचा अनुभव आहे. वातावरणातील बदलामुळे कृषिपंपासाठी लागऱ्या विजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे बुधवारी अचानक विजेची मागणी वाढली. 
उन्हाळ्यात एकाचवेळी राज्यभरात विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दिवसाच्या मागणीपेक्षा रात्रीच्या मागणीचा पुरवठा करण्यासाठी महावितरणला तारेवरची कसरत करावी लागते. प्रसंगी काही भागांतील विजेत कपात करून मेट्रो शहराला अखंड वीजपुरवावी लागते. गेल्या बुधवारी असाच प्रसंग उद्भवला मात्र कुठेही भारनियमन न करता विजेची मागणी पूर्ण करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला.
महावितरणने दीर्घकालीन वीज खरेदी करार असलेल्या महानिर्मितीकडून ७ हजार ८५३ मेगावॉट एनटीपीसी व एनपीसीआयएल कंपनीकडून एकूण ४ हजार १३४ मेगावॉट तसेच खासगी प्रकल्प जसे अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लूयू, एम्को इत्यादीकडून एकूण ४ हजार ५६७ मेगावॉट वीज उपलब्ध झाली आहे. नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतामधून, सौर ऊर्जा-१,८६४ , पवन ऊर्जा-१५६, व सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधून ९१२ मेगावॉट असे एकूण २ हजार ९३२ मेगावॉट वीज उपलब्ध झाली आहे.
उर्वरित विजेची मागणी ही इंडियन एनर्जी एक्सचेंजमधून ५७५ मेगावॉट वीज खरेदी करून व ९५० मेगावॉट कोयना जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मिती करून पूर्ण केली आहे.
यापूर्वी २३ आॅक्टोबर २०१८ला विजेच्या मागणीने उच्चांक गाठला होता. २० हजार ७४५ मेगावॉट कमाल वीजमागणीची नोंद करण्यात आली होती. मागणीतील वाढीमुळे बुधवारी २१ हजार ५७० मेगावॉटपर्यंत विजेची मागणी पोहोचली होती. आजपर्यंत नोंद झालेल्या कमाल वीज मागणीपेक्षा ८२५

Web Title:  The highest electricity demand was recorded in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.