विल्होळी गावात बेवारस कुत्र्यांची जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 07:34 PM2019-10-01T19:34:07+5:302019-10-01T19:34:46+5:30

विल्होळी : विल्होळी परिसर हा झपाट्याने वाढत असून नवनवीन वसाहत वाढत आहेत. त्याचप्रमाणे परिसरामध्ये कुत्र्यांची संख्याही वाढत आहे. येथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने आण िपरिसरातून कुत्रे सैरावैर धावत असल्याने लहान बालके ज्येष्ठ नागरिक त्रस्त, भयभीत झाले आहेत.

 Helpless dogs rally in the village of Wilhole | विल्होळी गावात बेवारस कुत्र्यांची जत्रा

विल्होळी गावात बेवारस कुत्र्यांची जत्रा

googlenewsNext
ठळक मुद्देसरपंच : नाशिक महानगर पालिकेच्या कृत्यामुळे ग्रामस्थांना त्रास

विल्होळी : विल्होळी परिसर हा झपाट्याने वाढत असून नवनवीन वसाहत वाढत आहेत. त्याचप्रमाणे परिसरामध्ये कुत्र्यांची संख्याही वाढत आहे. येथे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने आण िपरिसरातून कुत्रे सैरावैर धावत असल्याने लहान बालके ज्येष्ठ नागरिक त्रस्त, भयभीत झाले आहेत.
निर्बीजीकरणासाठी आणलेली कुत्री नंतर शहराबाहेर परिसरात सोडून दिले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नाशिक महापालिकेला वारंवार तक्र ार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे विल्होळी ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नाशिक महापालिकेने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा विल्होळी ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आला आहे.
गौळाणे रोडवरील खत प्रकल्प असल्याने तेथील अनेक कुत्रे रात्रीच्या वेळी येथे जमा होऊन महामार्गावरून जाणाऱ्या-येणाºया वाहनधारकांवर पादचाऱ्यांना विद्यार्थ्यांनावर भुंकत पाठलाग करतात. यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही दिवसापासून काही जनावरांना, मुले, माणसांना देखिल कुत्र्यांनी चावा घेतल्याने गावात कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता नाशिक महानगरपालिकेने त्वरित कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, विल्होळी परिसरात कुत्रे सोडणे बंद करावे असे विल्होळीवासिय बोलत आहेत.
प्रतिक्रि या.....
नाशिक महानगरपालिका शहरातील भटके कुत्रे निर्बीजीकरणानंतर विल्होळी परिसरात सोडून देत आहेत. महानगरपालिकेस याबाबात यापुर्वी देखिल वारंवार ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने निवेदन देऊनही नाशिक महापालिकेने त्याची दखल सुध्दा घेतलेली नाही. नाही. त्वरित सोडलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल.
- बाजीराव गायकवाड, सरपंच.
परिसरात महानगरपालिकेने सोडलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुले, जनावरे, ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये दहशत निर्माण झाली आहे. या कुत्र्यांचा त्विरत बंदोबस्त करावा अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल.
- संजय चव्हाण, विल्होळी.
 

Web Title:  Helpless dogs rally in the village of Wilhole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.