तीन हजार हेक्टरवरील शेतीपिकांना अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 10:40 PM2021-09-27T22:40:59+5:302021-09-27T22:41:50+5:30

मालेगाव : येथील महसूल, कृषी व पंचायत समितीने संयुक्त पथकाने तालुक्यात पाहणी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या बाधित क्षेत्रातील नुकसानीचा अंतिम अहवाल सादर केला. तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सहा गावांना फटका बसला होता. तालुक्यात ३३ टक्क्यांवर ३००७.५३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. ४ हजार ८१६ शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे नुकसानीपोटी मदत देण्यासाठी साधारण २ कोटी ४ लाख ५१ हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Heavy rains hit 3,000 hectares of crops | तीन हजार हेक्टरवरील शेतीपिकांना अतिवृष्टीचा फटका

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती जाणून घेताना तहसीलदार चंद्रजित राजपूत.

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव तालुका : दोन कोटी अनुदानाची आवश्यकता, सहा गावांचे नुकसान

मालेगाव : येथील महसूल, कृषी व पंचायत समितीने संयुक्त पथकाने तालुक्यात पाहणी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या बाधित क्षेत्रातील नुकसानीचा अंतिम अहवाल सादर केला. तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सहा गावांना फटका बसला होता. तालुक्यात ३३ टक्क्यांवर ३००७.५३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. ४ हजार ८१६ शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे नुकसानीपोटी मदत देण्यासाठी साधारण २ कोटी ४ लाख ५१ हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच अतिवृष्टी झाली. जळगाव निंबायती भागात सर्वाधिक ६६ व निमगाव मंडळात ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. साकुरी निं, चौकटपाडे, जाटपाडे, निंबायती, पाथर्डे व जेऊर हा परिसरात सर्वाधिक पाऊस झाला. तहसीलदार राजपूत यांनी दुसऱ्याच दिवशी नुकसानग्रस्त गावांना भेटी देत पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महसूल, कृषी व पंचायत समितीच्या पथकांनी पहाणी करुन नुकसानीचा अंतिम अहवाल तयार केला आहे. बाजरी, मका, सोयाबीन, तूर, कापूस, भुईमूग, कांदा, कुळीद, मटकी या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाला आहे. भरपाईचे अनुदान प्राप्त होताच त्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले जाईल असे तहसीलदार राजपूत यांनी सांगितले.

पिकांच्या नुकसानीची आकडेवारी (हेक्टरी)
बाजरी-४५१.६४, मका-१५४९.०३, सोयाबीन-०१, तूर-०२, कापूस-५३६.३०, भुईमूग-१९.४०, कांदा-४३८.१६, कुळीथ-०५, मटकी-०५, एकूण बाधित क्षेत्र-३००७.५३, अपेक्षित निधी-२०४.५१ (लाखात)
बाधित गावे -०६, बाधित शेतकरी संख्या - ४८१६.
 
Web Title: Heavy rains hit 3,000 hectares of crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.