मुसळधार पावसामुळे भात शेतीला दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 06:59 PM2020-09-22T18:59:59+5:302020-09-22T19:04:04+5:30

सर्वर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या टाकेद परिसरात जोरदार झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून भात निंदणीला वेग आला आहे.

Heavy rains bring relief to paddy farming | मुसळधार पावसामुळे भात शेतीला दिलासा

टाकेद परिसरात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर भात शेतीची निंदणी करतांना शेतकरी मजूर वर्ग.

googlenewsNext
ठळक मुद्देदमदार हजेरी : टाकेद परिसरात भात निंदणीला वेग

सर्वर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या टाकेद परिसरात जोरदार झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असून भात निंदणीला वेग आला आहे.

पूर्व भागातील अधरवड,पिंपळगावमोर,धामणी,खेड, परदेशवाडी,वासाळी,बारशिंगवे,सोनोशी,मायदरा, धानोशी ,अडसरे या परिसरातील भातशेतीलाशेती पूरक पाऊस पडल्याने या परिसरातील शेतकरी राजा भात निंदणी करण्यात व शेतीला शेवटच्या टप्प्यातील खते मारण्यात व्यस्त झाला आहे. चालू वर्षी जूनच्या सुरुवातीला मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर तब्बल जून जुलै या दोन महिन्यांत पावसाने पाठ फिरवली होती परिणामी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. कोरडा दुष्काळ पडतो की काय अशी परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी दुबार भाताची पेरणी केली व सिंचनाच्या ,विहिरीच्या,कुपनलिकेच्या पाण्यावर भाताची रोपे जगवली होती.त्यानंतर आॅगस्ट मध्ये वरूनराजाने एकाकी दमदार सुरुवात केल्यानंतर या परिसरातील शेतकºयांना चांगला दिलासा मिळाला व आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत या परिसरात भाताची आवणी, लागवड अंतिम टप्प्यात आली त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक शेतकºयांना भात शेतीला पूरक पाऊस नसल्याने भात वाढीसाठी रासायनिक खतांचा मारा करता येत नव्हता परंतु गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात दमदार मुसळधार पाऊस पडल्याने या परिसरातील बहुतांश शेतकरी वर्ग हा भात शेतीला वाढीसाठी ही रासायनिक खते देण्यात मग्न झाला आहे. तर अनेक शेतकरी मजूर भात निंदणी करण्यात व्यस्त झाला आहे. तसेच अनेक शेतकºयांच्या इंद्रायणी,गरे,हाळे,रुपम,ओम श्रीराम, सोनाली,आर चोवीस,एक हजार आठ आदी भाताच्या प्रजातींवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.कृषी विभागाकडून उपाययोजना करण्याची व शासनाकडून तातडीने पंचनामे करण्याची मागणी भात उत्पादक शेतक?्यांकडून प्रकर्षाने करण्यात येत आहे.अनेक शेतकºयांच्या भात पिकांवर करप्या रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे करप्या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी शेतकरी भात पिकांवर रोगप्रतिबंधक औषधफवारणी करण्यासाठी प्रयत्न करतो आहे.

 

Web Title: Heavy rains bring relief to paddy farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.