हरसूलची रु ग्णवाहिका आजारी अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 03:29 PM2020-09-15T15:29:19+5:302020-09-15T15:34:21+5:30

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : राज्यात कोरोनाच्या महामारीत आरोग्यदूत वैद्यकीय क्षेत्रासह रु ग्णवाहिका जीवन जननी ठरत आहेत, अनेक रु ग्णांना संकटसमयी हातभार लावून पुर्नजन्म देणाऱ्या रु ग्णवाहिकेला सर्वच स्तरावरून कोरोना काळात सलाम करण्यात येत आहे. मात्र हरसूल ग्रामीण रु ग्णालयाची रु ग्णवाहिका दुरावस्थेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

Harsul's artery is sick | हरसूलची रु ग्णवाहिका आजारी अवस्थेत

हरसूलची रु ग्णवाहिका आजारी अवस्थेत

googlenewsNext
ठळक मुद्देवाहनांच्या बंपरच्या दुरवस्थेबरोबरच वाहनक्र मांची मोडतोड

लोकमत न्यूज नेटवर्क
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : राज्यात कोरोनाच्या महामारीत आरोग्यदूत वैद्यकीय क्षेत्रासह रु ग्णवाहिका जीवन जननी ठरत आहेत, अनेक रु ग्णांना संकटसमयी हातभार लावून पुर्नजन्म देणाऱ्या रु ग्णवाहिकेला सर्वच स्तरावरून कोरोना काळात सलाम करण्यात येत आहे. मात्र हरसूल ग्रामीण रु ग्णालयाची रु ग्णवाहिका दुरावस्थेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
हरसूल (ता.त्र्यंबकेश्वर) येथे ग्रामीण रु ग्णालय आहे.या रु ग्णालयाला शासनाकडून वाहन देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून कुपोषित बालक, स्तनदा, गरोदर, प्रसूती महिला तसेच अपघाताच्या वेळी अनेकांची जीवनदायिनी ठरलेल्या रु ग्णवाहिका वरदान ठरत आहेत. कुणाच्या नशिबी जीवन वाहिनी तर कुणाच्या मरण वाहिनी या रु ग्णवाहिका ठरल्या आहेत. त्यात हरसूल हा ग्रामीण रु ग्णालयाशी नाळ जोडलेला मोठाव्याप्त परिसर आहे. तसेच काही पेठ तालुक्यातील गावांसाठी आरोग्याच्या दृष्टीकोनातून वरदान ठरत आहे. नाशिक जिल्हा रु ग्णालयाच्या अगोदर हरसूल येथील ग्रामीण रु ग्णालयात येथील भागातील प्रथम उपचारासाठी रु ग्ण, नातेवाईक धाव घेत आहेत. यामुळे येथील भागातील जनतेचा ओघ आरोग्याच्या दृष्टीने ग्रामीण रु ग्णालयाकडे दिसून येत आहे. मात्र हरसूल ग्रामीण रु ग्णालयाच्या रु ग्णवाहिकेच्या पुढील बंफरची दुरवस्था झाली आहे. यामुळे रु ग्णवाहिका आजारी असल्याचे एकंदरीत दिसत आहे. ही रु ग्णवाहिका (एम. एच.१५ एबी ७९) हरसूल-नाशिक तसेच अन्य ठिकाणी रु ग्णांचा जीव वाचविण्यासाठी धावणारी महत्वकांक्षी रु ग्णवाहिका दुरवस्थेत असल्याने हरसूल ग्रामीण रु ग्णालयाच्या रु ग्णवाहिकेला घरघर लागल्याचे दिसत आहे.

अभिप्राय :
हरसूल येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी तसेच अपघातसमयी कामात येणारी रु ग्णवाहिकाच जर दुरवस्थेत असेल तर आदिवासी भागातील रु ग्णांचे प्राण कसे वाचतील, रु ग्णवाहक ही आपला जीव मुठीत धरून गाडी चालवतात, त्यामुळे त्यांच्या बरोबर रु ग्णांचा जीव ही धोक्यात आहे. तसेच वाहन क्र मांक ही दुरवस्थेत झाला आहे. या रु ग्णवाहिकेची तात्काळ दुरवस्था थांबवावी.
- भारती भोये, सामाजिक कार्यकर्त्या.
(फोटो १५ हरसूल) : हरसूल ग्रामीण रु ग्णालयायाची रु ग्णवाहिका अशी दुरवस्थेत झाली आहे.

Web Title: Harsul's artery is sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.