मदतीसाठी सरसावले ‘युवा मित्र’चे हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 10:07 PM2020-04-02T22:07:28+5:302020-04-02T22:08:00+5:30

आठवड्यापासून घरातील किराणा संपलेला, पैसा संपलेला त्यामुळे पोटाची खळगी भरायची तरी कशी? या विवंचनेत असणाºया तालुक्यातील गरीब व मजुरीवर पोट असणाºया मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा, विदर्भासह आदी भागातील स्थलांतरित कुटुंबीयांसाठी ‘युवा मित्र’ने पुढाकार घेतला आहे. १५ ते २० दिवस पुरेल इतका किराणा भेट देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून देत आहे.

Hands of 'young friend' rushed to help | मदतीसाठी सरसावले ‘युवा मित्र’चे हात

सिन्नर येथील कामगारांना किराणामालाचे वाटप करताना युवामित्रचे कार्यकर्ते.

Next
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : कामगारांसह हातावर पोट असणाऱ्यांना आधार

सिन्नर : गेल्या आठवड्यापासून घरातील किराणा संपलेला, पैसा संपलेला त्यामुळे पोटाची खळगी भरायची तरी कशी? या विवंचनेत असणाºया तालुक्यातील गरीब व मजुरीवर पोट असणाºया मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा, विदर्भासह आदी भागातील स्थलांतरित कुटुंबीयांसाठी ‘युवा मित्र’ने पुढाकार घेतला आहे. १५ ते २० दिवस पुरेल इतका किराणा भेट देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून देत आहे.
दररोज मजुरीसाठी कामाला जायचे. मिळालेल्या मजुरीतूनच रात्री चूल पेटवायची, मात्र लॉकडाउनमुळे घरातील किराणा संपलेला, काम नसल्याने पैसा संपलेला. असे असूनही काही खरेदीसाठी जावे तर पोलीस मारतील याचा धाक. ही बाब ‘युवा मित्र’चे संस्थापक व कार्यकारी संचालक सुनील पोटे यांनी हेरली व यासाठी मदतनिधी देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना व इतर दानशूर व्यक्तींना केले. यावर अनेकजणांनी प्रत्येकी १५०० रु पयांची मदत देऊन या समाजकार्यात सहभाग घेतला. त्याचबरोबर शासनाच्या आरोग्यविषयक सूचनांचे तंतोतंत पालन करून तालुक्यातील अनेक भागातील कामगार, बांधकाम व्यावसायातील मजूर व गोरगरिबांना किराणा देऊन त्यांचे जीवन
सुकर करण्याचे काम संस्थेने केले आहे.
काही दिवसांपूर्वी माळेगाव औद्योगिक वसाहतीत अडकून पडलेल्या मध्य प्रदेशातील कामगारांच्या २१ कुटुंबांनी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र सोशल माध्यमावर व्हायरल झाले. यानंतर युवा मित्रने या कुटुंबीयांचा शोध घेत त्यांनाही किराणा सुपुर्द केला.
अनेक कुटुंबांचा शोध घेऊन त्यांनाही किराणा पोहचिवण्याचा उपक्र म ‘युवा मित्र’कडून सुरू आहे. याप्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे, स्टईसचे व्यवस्थापक कमालकर पोटे, विलास, नाठे, रतन माली, संताजी जगताप, माळेगावचे तलाठी राहुल देशमुख, वावीचे सरपंच सतीश भुतडा आदी उपस्थित होते.
कुंदेवाडी फाट्यावर भीक मागून जगणाºया जालना जिल्ह्यातील २५ कुटुंबे, मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीमध्ये रोजंदारीवर काम करणारे १२ कुटुंबे, तसेच खापराळे येथील २ कुटुंबे, गोजरे मळा परिसरातील १२ कुटुंबे, सिन्नर न्यायालय परिसरातील २ कुटुंबे, लोणारवाडी येथील १ कुटुंब असे शंभरहून अधिक कुटुंबांना तीन दिवसांत भरीव मदत या मंडळातर्फे करण्यात आली आहे.

Web Title: Hands of 'young friend' rushed to help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.