घोटभर पाणी, मुठभर धान्य; निसर्ग प्रेमी ग्रुपचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 06:55 PM2021-04-14T18:55:05+5:302021-04-14T18:57:04+5:30

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निसर्ग प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येत पक्ष्यांची तहान व भुक भागविण्यासाठी ह्यघोटभर पाणी, मूठभर धान्यह्ण ही संकल्पना येवला वनविभागातील कसारखेडा, सावरगाव परिसरातील फॉरेस्ट येथे राबविली आहे.

A handful of water, a handful of grain; An initiative of a nature lover group | घोटभर पाणी, मुठभर धान्य; निसर्ग प्रेमी ग्रुपचा उपक्रम

येवला तालुक्यातील सावरगाव कासारखेडा फॉरेस्ट येथे पक्ष्यांसाठी अन्न-पाण्याची सोय करताना निसर्गप्रेमी ग्रुपचे सदस्य.

googlenewsNext

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील निसर्ग प्रेमी या ग्रुपच्या माध्यमातून तरुणांनी एकत्र येत पक्ष्यांची तहान व भुक भागविण्यासाठी ह्यघोटभर पाणी, मूठभर धान्यह्ण ही संकल्पना येवला वनविभागातील कसारखेडा, सावरगाव परिसरातील फॉरेस्ट येथे राबविली आहे.

उन्हाचा दाह हा चांगलाच वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे पशु-पक्ष्यांना अन्न- पाण्याच्या शोधात भटकावे लागत आहे. त्यामुळे वन्यजीवांसाठी काही मित्रांनी एकत्र येत जन्मदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळत येवला तालुक्यातील वन विभागाच्या कोळम व पिंपळखुटे फॉरेस्टमधील पाणवठ्यामध्ये वन्य जीवांना पाण्याची नियमीत सोय उपलब्ध करून दिली आहे. निसर्ग प्रेमी ग्रुपचे लखन पाटोळे यांनी परिसरात झाडांवर, घरावरती टाकाऊ वस्तूंपासून पाणवठे तयार केले आहे. नागरीकांनी देखील पक्ष्यांसाठी अंगणात पाणी ठेवून व पशु-पक्षी संवर्धन करावे असे आवाहन निसर्ग प्रेमींना केले आहे.
या उपक्रमासाठी संकेत कुऱ्हाडे, विकी शिंदे, सागर पवार, बंटी भावसार, समाधान शेलार, अमोल उंडे व येवला परिसरातील निसर्ग प्रेमी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवत आहेत.

 

Web Title: A handful of water, a handful of grain; An initiative of a nature lover group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.