चौघांना बेड्या : बुलेटवरून येत कोयते नाचवत टोळक्याचा धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 04:14 PM2020-08-03T16:14:41+5:302020-08-03T16:21:46+5:30

‘तुमचा बेतच बघतो, तुम्हा सगळ्यांना कोयत्याने कापून काढेल’ असा दम भरत धिंगाणा घातला. या समाजकंटकांच्या टोळक्याने नाईट कर्फ्यू, जमावबंदी आदेश धाब्यावर बसवून कायदासुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला

Handcuffs to four: A mob coming from a bullet and dancing | चौघांना बेड्या : बुलेटवरून येत कोयते नाचवत टोळक्याचा धुडगूस

चौघांना बेड्या : बुलेटवरून येत कोयते नाचवत टोळक्याचा धुडगूस

Next
ठळक मुद्देकोयत्याने कापून काढेल’ असा दम मागील भांडणाची कुरापत

नाशिक : बुलेटवर आलेल्या समाजकंटकांच्या टोळक्याने सर्रासपणे कोयते नाचवत दारूच्या रिकाम्या बाटल्या अन् दगड भिरकावत आंबेडकरनगर, शिवाजीनगर, पंचशीलनगर या भागात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी (दि.२) बुलेटवर संशयित शुभम भालेराव, तुषार उर्फ सोनु केदारे, गणेश उर्फ बॉबी भालेराव, रोशन पगारे यांनी बुलेटवर येत परिसरात जोरजोराने आरडाओरड करत धुडगुस घातला. यावेळी फिर्यादी मंगल बाळु दाणी (४०,रा.पंचशीलनगर, गांगुर्डे चौक) यांना कोयता दाखवून मागील भांडणाची कुरापत काढत त्यांच्या घरावर दगडफेक करत काचेच्या बाटल्या भिरकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. टोळक्याच्या या धिंगाण्यामुळे परिसरात एकच दहशत निर्माण झाली. यावेळी लता राजमाने, नलीनी गांगुर्डे यांच्याही घरांच्या पत्र्यांवर दगडफेक करून टोळक्यामधील सोनू याने ‘तुमचा बेतच बघतो, तुम्हा सगळ्यांना कोयत्याने कापून काढेल’ असा दम भरत धिंगाणा घातला. या समाजकंटकांच्या टोळक्याने नाईट कर्फ्यू, जमावबंदी आदेश धाब्यावर बसवून कायदासुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
चौघांना ठोकल्या बेड्या
उपनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तत्काळ तपासाची चक्रे फिरवत द्वारका येथील मनपाच्या ५४ क्वार्टर वसाहतीतून रोशन वसंत भालेराव, (२३), शुभम अनिल भालेराव (२१, शिवाजीनगर), तुषार उर्फ सोनु केदारे, गणेश जगदीश भालेराव या चौघांच्या मुसक्या बांधल्या. त्यांच्यावर दगडफेक करून घरांचे नुकसान करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक उपनिरिक्षक पी.बी.सुर्यवंशी हे करीत आहेत.

Web Title: Handcuffs to four: A mob coming from a bullet and dancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.