२७ हजार ६०० रु पयांचा देवळा शहरात गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 05:17 PM2020-09-29T17:17:43+5:302020-09-29T17:18:21+5:30

देवळा : अवैध धंद्यांंवर धाडी तर विना मास्क फिरणाºयावर मंगळवारी (दि.३०) देवळा पोलिसांनी कारवाई केली. बेकायदेशीर गुटखा विक्र ी प्रकरणी स्थानिक पोलिसांनी छापा टाकून २७ हजार ६०० रु पयांचा गुटखा जप्त केला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाºया १६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

Gutkha worth Rs 27,600 seized in Deola | २७ हजार ६०० रु पयांचा देवळा शहरात गुटखा जप्त

पाच कंदील चौकात नियम मोडणाºया वाहनचालकांवर कारवाई करतांना पोलिस.

Next
ठळक मुद्देकोरोना : विनामास्क फिरणाऱ्या १६ नागरिकांवर पोलिसांची कारवाई





देवळा : अवैध धंद्यांंवर धाडी तर विना मास्क फिरणाºयावर मंगळवारी (दि.३०) देवळा पोलिसांनी कारवाई केली. बेकायदेशीर गुटखा विक्र ी प्रकरणी स्थानिक पोलिसांनी छापा टाकून २७ हजार ६०० रु पयांचा गुटखा जप्त केला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क फिरणाºया १६ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे व पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहीती पोलिस उपनिरीक्षक संजय मातोंडकर यांनी दिली.
बेकायदेशीर गुटखा विक्र ी प्रकरणी देवळा शहरातील त्रंबक केदु शिरोडे यांच्यावर कारवाई करण्यात येऊन त्यांच्या दुकानातून २७,६०० रूपये किमतीचा वेगवेगळया कंपनीचा गुटखा जप्त करण्यात आला. याबाबत अन्न प्रशासन विभागाला कळवून त्यांच्यामार्फत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील पानपट्टी चालकांना पोलीस ठाण्यात बोलावून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्र ीबाबत योग्य त्या सूचना देण्यात येऊन त्यांच्यावर कोरोना संसर्ग पसरवून शांतता भंग होऊ नये याकरिता सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.
तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील पाचकंदील चौकात पोलीस नाईक रवींद्र मल्ले, अंकुश हेंबाडे व होमगार्ड यांनी सोमवारी (दि.२८) देवळा शहरात विना मास्क फिरणाºया १६ नागरिकांवर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केली. यापुढे ही कारवाई अशीच सुरूच राहणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी दिली.
 

Web Title: Gutkha worth Rs 27,600 seized in Deola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.