महिलांच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 11:03 PM2020-01-16T23:03:46+5:302020-01-17T01:22:45+5:30

आरबीएच कन्या विद्यालयात प्राचार्य श्रीमती ए.जे. जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थिनींना महिलांचे अधिकार, कायदे, आरोग्य व स्वास्थ्य याबाबत डॉ. पूनम सोनवणे, तेजस्विनी जामदार, माधुरी गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.

Guidance on women's rights | महिलांच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन

मालेगाव कॅम्पातील आरबीएच विद्यालयात झालेल्या आनंद मेळ्याप्रसंगी प्राचार्य ए.जे. जोंधळे, प्रमिला पाटील, कीर्ती पवार, डॉ. पूनम सोनवणे, तेजस्विनी जामदार, माधुरी गांगुर्डे व विद्यार्थिनी.

googlenewsNext
ठळक मुद्देआरबीएच कन्या विद्यालय : खरी कमाई महोत्सव, आनंदमेळा

मालेगाव : येथील आरबीएच कन्या विद्यालयात प्राचार्य श्रीमती ए.जे. जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थिनींना महिलांचे अधिकार, कायदे, आरोग्य व स्वास्थ्य याबाबत डॉ. पूनम सोनवणे, तेजस्विनी जामदार, माधुरी गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले.
कामिनी चौधरी, सीमा मराठे यांनी आरोग्य व स्वास्थ्यविषयी यांची माहिती दिली. प्राचार्य श्रीमती अलका जोंधळे यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास उपप्राचार्य आर.जी. पाटील, पर्यवेक्षिका प्रमिला पाटील व कीर्ती पवार, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन माधवी नेरकर यांनी केले.
खरी कमाई महोत्सव
आरबीएच कन्या विद्यालयात प्राचार्या अलका जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात स्काउट- गाइडअंतर्गत खरी कमाई महोत्सव साजरा करण्यात आला. उद्घाटन माता-पालक संघाचे उपाध्यक्ष श्रीमती अस्मिता सूर्यवंशी, सहसचिव जयश्री मोरे यांच्या हस्ते झाले. पर्यवेक्षिका प्रमिला पाटील, मंजूषा शेवाळे, माया पाटोळे, श्रीमती एस.के. निकम, माधवी नेरकर, कविता खैरनार यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्राचार्या अलका जोंधळे, उपप्राचार्य आर.जी. पाटील, पर्यवेक्षिका प्रमिला पाटील, कीर्ती पवार यांच्यासह शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजूषा शेवाळे यांनी केले.

Web Title: Guidance on women's rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.