ंंंमहिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 03:48 PM2019-12-09T15:48:38+5:302019-12-09T15:49:34+5:30

पेठ -शासकिय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये विशेष करून महिला शिक्षिका मध्ये व्यक्तीमत्व विकास घडावा या उद्देशाने पेठ तालुक्यातील खास माहिला शिक्षिकांसाठी एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.

 Guidance on the health of women | ंंंमहिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन

पेठ तालुक्यातील महिला शिक्षक कार्यशाळेप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भूवनेश्वरी, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, सरोज जगताप, मनिषा जगताप, मिनल जयस्वाल, स्वरांजली पिंगळे, धनश्री कुवर, कळंबे यांचे सह महिला शिक्षक कर्मचारी.

Next
ठळक मुद्दे पेठ :तालुका महिला शिक्षिका कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा


सरकारी वकील अरु ण दोंदे यांनी महिलांविषयक कायदे व कलमांची माहिती दिली. इन्वरल क्लबच्या माजी अध्यक्ष डॉ.मनिषा जगताप यांनी स्त्रियांचे आरोग्य व काळजी या विषयावर मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी कार्यशाळेस भेट देऊन शालेय अध्यापन व गुणवत्ता वाढीसाठी महिला शिक्षकांनी आपली कार्यक्षमता वाढवण्याची गरज असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी महिला शिक्षकाशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. पेठ सारख्या अतिदुर्गम भागात ज्ञानदान करणाºया महिलया कर्मचाºयांचे त्यांनी कौतूक केले. यावेळी विशाखा समितीची स्थापना करण्यात आली. गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांनी प्रास्तविक तर मंदा जाधव यांनी सुत्रसंचलन केले. याप्रसंगी छाया पाटील, स्वरांजली पिंगळे, मिनल जयस्वाल, धनश्री कुवर,आदी उपस्थित होत्या
 -
 

Web Title:  Guidance on the health of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.