नाशिक सीएच्या सभेत सायबर क्राइमविषयी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:16 AM2021-07-28T04:16:15+5:302021-07-28T04:16:15+5:30

नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नाशिक शाखेची ३९व्या वार्षिक सभेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ...

Guidance on cyber crime in Nashik CA meeting | नाशिक सीएच्या सभेत सायबर क्राइमविषयी मार्गदर्शन

नाशिक सीएच्या सभेत सायबर क्राइमविषयी मार्गदर्शन

Next

नाशिक : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया नाशिक शाखेची ३९व्या वार्षिक सभेत पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सायबर क्राइम विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केेले. सीए इन्स्टिट्यूटच्या निवडक सभासदांच्या उपस्थितीत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत वार्षिक सभेते नियोजन केले होते. सायबर क्राइम ही आजच्या काळात होणारी सामान्य गोष्ट असून अशा गुन्ह्यांपासून बचावासाठी सर्वांनीच सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करतानाच पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी ‘सायबर क्राइम अँड सिक्युरिटी’ विषयावर ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने सर्व सभासदांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी फायनॅन्शिअल फ्रॉड, हॅकिंग, फेक प्रोफाइल, सॉफ्टवेअर पायरेसी आणि सायबर टेरेरिसम अशा विविध उपविषयांविषयी सभासदांना माहिती दिली. या बैठकीला नाशिक सीए शाखेचे अध्यक्ष, राजेंद्र शेटे, उपाध्यक्ष, सोहिल शाह, सचिव, राकेश परदेशी, खजिनदार, संजीवन तांबूळवाडीकर, हर्षल सुराणा, रोहन आंधळे, पीयूष चांडक आदी उपस्थित होते.

Web Title: Guidance on cyber crime in Nashik CA meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.