राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना ग्रामस्वच्छतेतून अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 10:39 PM2020-02-23T22:39:25+5:302020-02-24T00:54:20+5:30

इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्ते, नाले, ग्रामपंचायतीचे प्रांगण आदी ठिकाणी स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबविले.

Greetings from village cleanliness to Rashtrasant Gadge Maharaj | राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना ग्रामस्वच्छतेतून अभिवादन

साकूर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करताना ग्रामस्थ.

googlenewsNext
ठळक मुद्देनांदूरवैद्य : संपूर्ण गावातून प्रभातफेरी

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील साकूर येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गावातील अंतर्गत रस्ते, नाले, ग्रामपंचायतीचे प्रांगण आदी ठिकाणी स्वच्छता करून स्वच्छता अभियान राबविले.
गावातील भजनी मंडळाच्या वतीने टाळ मृदंगाच्या ठेक्यात गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाच्या जयघोषात संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य व परिट समाजाचे कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण गावाची स्वच्छता केली.
याप्रसंगी साकूर ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद आवारी, उपसरपंच दिनकर सहाणे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम सहाणे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. गावातील मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनकार्याविषयी भाषणे केली. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य तुकाराम सहाणे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मूर्तिपूजा, अंधश्रद्धा निर्मूलन, सावकारी कर्ज, व्यसनमुक्ती याविरुद्ध गाडगे महाराजांनी जनजागरण करून समाजाला सुधारण्यासाठी सामाजिक कार्य केल्याचे सांगितले.

Web Title: Greetings from village cleanliness to Rashtrasant Gadge Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.