द्राक्षबागा भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:23 PM2020-03-27T23:23:38+5:302020-03-27T23:24:26+5:30

जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत.

Grapefruit | द्राक्षबागा भुईसपाट

अवकाळी पावसामुळे कोलमडलेली द्राक्षबाग

googlenewsNext
ठळक मुद्देअवकाळी पावसाचा तडाखा : शेतकऱ्यांचे लाखो रुपये पाण्यात

लासलगाव : जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत.
लासलगाव परिसरातील आसपासच्या गावांमध्ये गुरुवारी (दि. २६) सायंकाळी सुमारे एक तास लहान गारांसह तर शुक्र वारी (दि. २७) पहाटे मेघगर्जनेसह जोरदार वारा-वादळात सुमारे दीड तास अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे निमगाव वाकडा, पाचोरे, लासलगाव, ब्राह्मणगाव, विंचूर परिसरातील द्राक्षबागा, कांदा, हरभरा व कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरीवर्गाने केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून निमगाव वाकडा व लासलगाव शहर परिसरात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. तसेच वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाºया बदलामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यात निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस व जोरदार वादळाचा फटका शेतकरी निवृत्ती गायकर यांच्या ११ एकरातील द्राक्षबागेला बसल्याने बागा अक्षरश: कोलमडून पडल्या आहेत.
निर्यातक्षम द्राक्ष पिकविणाºया निफाडची ख्याती सातासमुद्रापार पोहचली असताना कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम व दर्जेदार द्राक्ष पिकांना याचा फटका बसला. परिणामी द्राक्ष पिकांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने द्राक्षमालाची उलाढाल पूर्णपणे थांबली आहेच त्यात तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकºयांपुढे दुहेरी संकट ओढवले आहे. शासनाने नुकसान झालेल्या द्राक्षबागेस लवकरात लवकर भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

कोरोनामुळे द्राक्षे झाडावरच
कोरोनाने जगभर थैमान घातले असताना निर्यातही पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षे ही गेल्या काही दिवसांपासून झाडावरच आहेत. कोरोनाचे सावट दूर होईल आणि चार पैसे मिळतील या अपेक्षेवर शेतकरी असतानाच अस्मानी संकटाने शेतकºयांना घेरले आणि उद्ध्वस्त केले. त्यामुळे परिसरातील शेतकरीवर्गाचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहे.

निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेला अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाºयामुळे माझ्या ११ एकरावरील द्राक्षबागेचे पूर्णपणे नुकसान होत बागा भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे सुमारे ५० ते ६० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाकडून लवकरात लवकर भरपाई मिळाली पाहिजे.
- निवृत्ती गायकर,
नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार

Web Title: Grapefruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.