ग्रामपंचायतीची कर वसुली ठप्प...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 03:25 PM2020-08-06T15:25:55+5:302020-08-06T15:26:28+5:30

नांदूरशिंगोटे : ऐन मार्च एंडच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणू संसर्ग थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वत्र व्यवसाय, व्यापार, जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही मिहन्यापासून ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर देखील याचा चांगलाच परिणाम झाला. मागील पाच मिहन्यात सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीची कर वसुली शून्य टक्क्यांवर येऊन ठेपली असून, याचा परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आठवडे बाजार बंद असल्याने त्याची लिलाव प्रक्रि याही थांबलेली आहेत.

Gram Panchayat tax collection stalled ... | ग्रामपंचायतीची कर वसुली ठप्प...

ग्रामपंचायतीची कर वसुली ठप्प...

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : आठवडे बाजार लिलावाची प्रकिया थांबली

नांदूरशिंगोटे : ऐन मार्च एंडच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणू संसर्ग थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वत्र व्यवसाय, व्यापार, जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही मिहन्यापासून ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर देखील याचा चांगलाच परिणाम झाला. मागील पाच मिहन्यात सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीची कर वसुली शून्य टक्क्यांवर येऊन ठेपली असून, याचा परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आठवडे बाजार बंद असल्याने त्याची लिलाव प्रक्रि याही थांबलेली आहेत.
मालमत्ता कर, पाणीपट्टी कर, आठवडे बाजार लिलाव, व्यावसायिक कर, दुकान गाळे भाडे यातून येणारे उत्पन्न ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीच्या फंडात जमा केले जाते. या फंडामधून दैनंदिन किरकोळ कामे, पाणी पुरवठा कर्मचारी वेतन, कंत्राटी कामगारांचे वेतन, किरकोळ साहित्य खरेदी, स्टेशनरी, बांधकाम याशिवाय परिस्थिती निहाय गावात निघणारी तातडीची कामे केली जातात. दरवर्षी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे 80 ते 90 टक्क्यांच्या जवळपास करांची वसुली होत असते. विशेषत: आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्च मिहन्यात ही वसुली मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जाते. मात्र यंदा मार्च मिहन्यातच कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर लाँकडाऊन करण्यात आले. याचा परिणाम कर वसुलीवर झाला आहे. राज्यात टप्याटप्याने व्यवहार सुरळीत होत असले तरी काही प्रमाणात निर्बंध असल्याने पूर्वपदावर येण्यास मोठा कालावधी लागणार आहे. ग्रामीण भागातील व्यवसाय सुरु झाले असले तरी पाहिजे त्या प्रमाणात ग्राहक बाहेर पडत नाही. ग्रामीण भागात कोरोना बाधित रु ग्ण आढळल्यास प्रशासन सदर ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करतात. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होताच त्याचा परिणाम बाजारपेठवर होतो.
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ तसेच कृषी उत्पन्न बाजार समतिीचे उपबाजार आवार असल्याने मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. दर शुक्र वारी येथे आठवडे बाजार व उपबाजारात कांदा लिलाव तसेच धान्य भुसार मालाचे लिलाव होतात. आठवडे बाजारातून ग्रामपंचायतीला दरवर्षी उत्पन्न मिळते. ही कर वसुली करण्यासाठी लिलाव प्रक्रि या करून ठेकेदाराला कर वसुलीसाठी परवानगी दिली जाते. त्याच्या बदल्यात त्याच्याकडून एक विशिष्ट रक्कम घेतली जाते. यावर्षी मात्र कोरोना संसर्गामुळे बाजार वसुली लिलावाची
प्रक्रि याही झालेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पान्नावर मोठा परिणाम झाला आहे.

ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे साधन असलेल्या पाणीपट्टी व मालमत्ता कर वसुली गेल्या सहा मिहन्यापासून ठप्प झालेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याचा परिणाम होवून जनजीवन विस्कळीत होत आहे. आठवडे बाजार बंद असल्याने वसुली लिलाव प्रक्रि याही थांबली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवरु न खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात काटकसर करून ग्रामपंचायत कामकाजाचे नियोजन करण्यात येईल.
गोपाल शेळके, सरपंच, नांदूरशिंगोटे

Web Title: Gram Panchayat tax collection stalled ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.