नाशिकरोड कारागृहातील कैद्यांकडून शासनास मदत निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 03:51 PM2020-03-31T15:51:28+5:302020-03-31T15:52:24+5:30

नाशिकरोड कारागृहात सुतार, लोहार, विणकाम, मूर्तीकाम, रसायन, बेकरी अशा दहा कारखान्यांचा समावेश आहे. तसेच शेती देखील आहे. तेथे पक्के कैदी काम करतात. त्यांना पगार दिला जातो

Government aid funds from prison inmates | नाशिकरोड कारागृहातील कैद्यांकडून शासनास मदत निधी

नाशिकरोड कारागृहातील कैद्यांकडून शासनास मदत निधी

Next
ठळक मुद्देदोन लाख ७८ हजाराचा निधीचा धनादेश सरकारला जमा करण्यात आलावीस हजार मास्क कैदी बांधवांनी बनवून उपलब्ध करून देत मोठा हातभार लावला आहे.

लोकमत न्युज नेटवर्क
नाशिकरोड : भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शासनाला मदतीसाठी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील बंद्यांनी दोन लाख ७८ हजाराचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला आहे.


कारागृह अधिक्षक प्रमोद वाघ आणि वरिष्ठ अधिकारी अशोक कारकर यांनी या निधीचा धनादेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सुपूर्द केला. कैद्यांनी कारागृह काम करून मिळवलेल्या पगारातून एकत्रितरीत्या कोरोनाच्या लढाईमध्ये शासनाला आर्थिक मदत करण्यासाठी एकत्रितरीत्या आर्थिक योगदान देऊन आदर्श घडवला आहे. पक्क्या कैद्यांना कायद्यानुसार काम द्यावे लागते. नाशिकरोड कारागृहात सुतार, लोहार, विणकाम, मूर्तीकाम, रसायन, बेकरी अशा दहा कारखान्यांचा समावेश आहे. तसेच शेती देखील आहे. तेथे पक्के कैदी काम करतात. त्यांना पगार दिला जातो. तो कारागृह प्रशासनाकडे सुरक्षित ठेवला जातो. शिक्षा संपल्यावर तसेच गरजेच्या वेळी हा पगार कैद्यांना दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यक्तींना देणगीचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद म्हणून अधिक्षक प्रमोद वाघ आणि अशोक कारकर यांनी कैद्यांना मदतीचे आवाहन केले. त्याला कैद्यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. आपल्या पगारातील शंभरापासून हजारापर्यंतची रक्कम कैद्यांनी सरकारला देण्याचे ठरवले. त्यानुसार दोन लाख ७८ हजाराचा निधीचा धनादेश सरकारला जमा करण्यात आला. या आधी केरळच्या पूरग्रस्तांना दोन लाखावर निधी दिला होता. कारागृह कर्मचारी व अधिकारीही आपला एक दिवसाचा पगार शासनाला देणार असल्याचे प्रमोद वाघ यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत कारागृहातुन सुमारे वीस हजार मास्क कैदी बांधवांनी बनवून उपलब्ध करून देत मोठा हातभार लावला आहे.

Web Title: Government aid funds from prison inmates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.